शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

भूदान घोळ; वर्धा उपविभागातील ३१ प्रकरणे सुनावणीसाठी प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 18:08 IST

आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत जिल्ह्यात १९०० हेक्टर जमीन प्राप्त झाली. यातील बहुतांश जमिनीची नियमांना डावलून विल्हेवाट लावली. याबाबत तक्रारीनंतर वर्धा उपविभागात ४८ प्रकरणे अनियमित आढळली.

ठळक मुद्देसातमध्ये आदेश पारित पांढरकवडा येथील जमीन शासन जमा

प्रशांत हेलोंडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत जिल्ह्यात १९०० हेक्टर जमीन प्राप्त झाली. यातील बहुतांश जमिनीची नियमांना डावलून विल्हेवाट लावली. याबाबत तक्रारीनंतर वर्धा उपविभागात ४८ प्रकरणे अनियमित आढळली. या प्रकरणांची उपविभागीय अधिकाºयांकडे सुनावणी सुरू आहे. यातील सात प्रकरणांत आदेश पारित केले असून एक जमीन शासन जमा केली. भूदान जमीन घोळ ‘लोकमत’ने सर्वप्रथम उजेडात आणला होता, हे विशेष! यानंतर प्रशासनाने चौकशीचे सुत्र हलवून कारवाई सुरू केली.जिल्ह्यात भूदान चळवळीत प्राप्त जमिनीत मोठा घोळ झाला. यातील जमिनी संस्थानिक, ले-आऊट धारकांच्या घशात घातल्या. यामुळे गरजू, भूमिहिन जमिनींपासून वंचित राहिले. याबाबत आरटीआय अंतर्गत प्राप्त माहितीवरून ‘लोकमत’ने पाठपुरावा केला. शिवाय लोकसभेसह, विधान परिषद, विधान सभेतही प्रश्न उपस्थित झाले. यानंतर राज्यस्तरावर समिती नेमली गेली; पण त्यांचा अहवाल आला नाही. राज्य शासनाच्या आदेशावरून जिल्ह्यात भूदानातील जमिनींची चौकशी सुरू झाली; पण अपवाद वगळता कारवाई होत नसल्याचेच चित्र आहे.वर्धा उपविभागात ४८ प्रकरणांत एसडीओंसमोर सुनावणी होत आहे. यातील सात प्रकरणांत तत्कालीन एसडीओ घनश्याम भूगावकर यांनी आदेश पारित केले. चार आदेशांवर सह्या व्हायच्या असून तीन आदेश जारी झाले. यात पांढरकवडा येथील सर्व्हे क्र. ११६ मधील संदीप काचोळे यांच्या जमिनीच्या मालकी हक्कात घोळ आढळल्याने ती शासन जमा करण्यात आली. पिपरी (मेघे) येथील छाया मुंधडा यांच्या जमिनीबाबत सर्व्हे क्र. १२४ च्या भूदान जमिनीची नोंद घ्यावी व ६४/१ मधील नोंद वगळण्याचे आदेश दिलेत. डोरली येथील सुमित्रा धुर्माळे यांना प्राप्त जमिनीमध्ये शर्तभंग न आढळल्याने ती जैसे थे ठेवली. यातील १० प्रकरणांत न्यायालयात दाद मागितली असून उर्वरित ३१ प्रकरणांत एसडीओंमार्फत सुनावणी घेतली जात आहे. २२ आॅगस्ट रोजी १२-१३ प्रकरणांवर सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.