शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

भोसलेकालीन सराय होताहेत इतिहासजमा

By admin | Updated: May 7, 2016 02:13 IST

वऱ्हाड प्रांतात त्याकाळी भोसले वंशवळीतील राजे-महाराजांनी इतिहास गाजवित आपले अस्तित्व कायम ठेवले.

लोकप्रतिनिधींचे ऐतिहासिक सरायकडे दुर्लक्ष : राज्य पुरातत्त्व विभागाची पाठपुराव्याकडे वक्रदृष्टीपुलगाव : वऱ्हाड प्रांतात त्याकाळी भोसले वंशवळीतील राजे-महाराजांनी इतिहास गाजवित आपले अस्तित्व कायम ठेवले. त्यातील एक म्हणजे जिल्ह्यातील नाचणगाव येथील भोसलेकालीन सराय. परंतु काळाच्या स्थित्यंतरामुळे ही वास्तू आज भग्नावस्थेत पाहायला मिळते. याची देखभाल दुरुस्ती होत नसल्याचे दिसून येत आहे.महाराष्ट्र राज्याला मराठी सत्तेचे राज्य म्हणून संबोधल्या जाते. छत्रपती शिवाजी राजे, संभाजी राजे, माधवराव पेशवे, भोसले यासारख्या मराठी माणसाची अस्मिता जोपासून, अटकेपर्यंत मराठ्यांचा इतिहास गाजविला. त्यांच्या कारकीर्दितील राजे राजवाडे, किल्ले, सराय, गडी आजही मराठी सत्तेच्या इतिहासाची साक्ष देतात. नाचणगाव येथील ही भोसले कालीन सराय सिद्धेश्वर मंदिर तलाव, पुरातन शिवमंदिर, भवानी मंदिर या वास्तू ऐतिहासिक संपन्नतेची साक्ष देतात. नजीकच्या कोटेश्वर येथील देवस्थान पौराणिक परंपरेचे ग्वाही देणारे आहे.नाचणगाव येथील बाजार चौकात २०० बाय २०० फुटाची या क्षेत्रात ही प्राचीन सराय आहे. या सरायचा उपयोग भोसलेकाळात घोडेपागे सारख्या होत असल्याचे बोलले जाते. जवळपास ४०० वर्षांपूर्वीची ऐतिहासिक किल्लावजा सराय आज काळाच्या पडद्याआड लुप्त होत असतानाही रटाळ राजकारणात अडकलेल्या येथील लोकप्रतिनिधींचे आजही या ऐतिहासिक वैभवाकडे दुर्लक्ष होत आहे.मजबूत व उत्कृष्ट बांधकामाचा नमुना असलेल्या या सरायमध्ये कलात्मक कमानीच्या आकाराच्या २१ खोल्या आहे. मध्यभागी, काळ्या दगडांनी बांधकाम केलेली पक्के बांधकाम असलेली प्राचीन विहिर आहे. २५ फुट रूंद व ७४ फुट खोल असलेल्या या विहिरीला पायऱ्या असून विहिरीच्या आत सैनिकांना बसण्यासाठी कप्पे तयार करण्यात आले होते. या विहिरीतून गावातच कुठेतरी भुयारी मार्ग असावा असेही जाणकार सांगतात. परंतु अद्याप याची कुठेच माहिती मिळालेली नाही.या वास्तूत उत्तरेकडील भागात सैनिकांच्या विश्रामासाठी काही खोल्या असून कमानीची आकाराच्या या खोल्यांची पडझड झालेली आहे. ४०० वर्षांनंतरही विहिर सुरक्षित असून विहिरीला भरपूर पाणी आहेत. या वास्तूच्या पश्चिमेकडील भागाची भिंती पूर्णत: खचली असून या प्राचीन वैभवाची दयनीय अवस्था झाली आहे. या वास्तूचे मुख्य प्रवेशद्वार उत्तरभागी आहे. प्रवेशद्वारालगत द्वारपालासाठी दोन छोटे कप्पे आहेत. ४०० वर्र्षांपूर्वीच्या शिलालेखावरून ही वास्तू दादाशाह नामक सुभेदारांनी बांधली असावी असे अशी माहिती मिळते. परंतु हा शिलालेख देखील भिंतीच्या पडझडीत काळाच्या पडद्याआड झाला. जुन्या काळी मोहिमेवर असताना रात्री विश्राम करण्यासाठी व सोबतच घोडदळ बांधण्यासाठी या सरायचा उपयोग केल्या जात असावा असा तर्क जाणकार वर्तवितात.१९७३ ते १९९६ असे २३ वर्ष या सरायच्या मालकीचा वाद न्यायप्रविष्ट होता. १९९६ मध्ये न्यायालयाने ही वास्तू नाचणगाव ग्रा.पं.कडे सोपविली. ग्रामस्थांनी ऐतिहासिक वास्तूकडे लक्ष वेधत ग्रामपंचायतच्या सहकार्याने येथे बाग निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या वास्तूचे जतन व्हावे यास्तव ग्रामपंचायत स्तरावर प्रयत्न गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)चार शतकांचा वैभवशाली इतिहास लोप पावण्याच्या मार्गावरशासनाच्या पुरातन व वस्तू संग्रहालय संचालनाच्या अनेक अधिकाऱ्यांनी येथे भेट देवून पाहणी देखील केली. मात्र पुढील कार्यवाही झालेली नाही.राज्य शासनाकडून ऐतिहासिक वास्तूचे अभ्यासपूर्ण निरीक्षण केल्यानंतर त्या वास्तूला राज्य सरंक्षित वास्तू म्हणून घोषित केले जाते. तसेच राज्य पुरातन विभागाकडून अशा वास्तूचे जनत व संवर्धन करण्यात येते. मात्र येथील सराय यापासून वंचित आहे.प्राचीन वास्तुंवर तत्कालीन इतिहासावर झालेला परिणाम, वास्तूच्या सध्याच्या स्थितीचा विचार करून तसेच मूळ स्थापत्य कला लक्षात घेवून ऐतिहासिक वास्तू अधिकाधिक काळ कशी टिकेल व मूळ कलेलाही धक्का पोहचणार नाही याची खबरदारी घेतली जाते. प्राचीन विहिरीची दैनावस्थाकाळ्या दगडांनी पक्के बांधकाम केलेली प्राचीन विहिर आहे. २५ फुट रूंद व ७४ फुट खोल असलेल्या या विहिरीला पायऱ्या असून विहिरीच्या आत सैनिकांना बसण्यासाठी कप्पे तयार केले आहे. ४०० वर्षांनंतरही ही विहिर सुरक्षित असून विहिरीला मुबलक पाणी आहेत. विहिरीकडे दुर्लक्ष होत असल्याने विहिर खचली आहे.या वास्तूत उत्तरेकडील भागात सैनिकांच्या विश्रामासाठी काही खोल्या असून कमानीची आकाराच्या या खोल्यांची पडझड झालेली आहे.