शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत ४०० कोटींचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 21:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वेतन वाढीच्या मागणीसाठी सरकारी बँकांमधील अधिकारी व कर्मचारी बुधवारपासून दोन दिवसाच्या देशव्यापी संपावर गेले आहेत. वर्धा जिल्ह्यातील ५०० वर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आहे. परिणामी, दोन दिवसांत जिल्ह्यातील तब्बल ४०० कोटींवर व्यवहार ठप्प झाले आहेत. या संपाचा फटका जिल्ह्यातील बँक खातेदार तथा शेतकऱ्यांना बसला आहे. बँका ...

ठळक मुद्देबँक कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका : ५०० कर्मचारी सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वेतन वाढीच्या मागणीसाठी सरकारी बँकांमधील अधिकारी व कर्मचारी बुधवारपासून दोन दिवसाच्या देशव्यापी संपावर गेले आहेत. वर्धा जिल्ह्यातील ५०० वर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आहे. परिणामी, दोन दिवसांत जिल्ह्यातील तब्बल ४०० कोटींवर व्यवहार ठप्प झाले आहेत. या संपाचा फटका जिल्ह्यातील बँक खातेदार तथा शेतकऱ्यांना बसला आहे. बँका बंद असल्याने एटीएमचे ट्रान्झेक्शनही प्रभावित झाल्याचे दिसून आले.जिल्ह्यात शासकीय ३० बँका असून लहान-मोठ्या बँका मिळून १४७ शाखा कार्यरत आहेत. शिवाय नागरिकांना तत्पर सेवा मिळावी म्हणून जिल्ह्यात १७७ एटीएम सुरू करण्यात आलेले आहेत. बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दोन दिवसाचा देशव्यापी संप पुकारल्याने या सर्व बँका तथा गुरूवारी बहुतांश एटीएमचे व्यवहारही ठप्प झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील मोठ्या शहरांमध्ये असलेल्या शासकीय बँकेचे एका दिवसाचे रोखीचे व्यवहार सुमारे ५ कोटी रुपये आहेत. याचा हिशेब केल्यास दोन दिवसांत ३० बँकांच्या माध्यमातून सुमारे ४०० कोटी रुपयांचे व्यवहार प्रभावित झाल्याचे सांगण्यात आले आहे. बुधवारपासून बँका बंद असल्याने गुरूवारी जवळपास सर्वच एटीएममधील रोकड संपल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. यामुळे एटीएमच्या माध्यमातून होणारे व्यवहारही गुरूवारी ठप्प झाल्याचे दिसून आले. बँका बंद आणि एटीएममध्ये ठणठणाट यामुळे नागरिकांची मात्र दाणादाण होत आहे.वर्धा शहरातील बँक आॅफ इंडिया, भारतीय स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र यासह अन्य सरकारी बँकांचे कामकाज ठप्प होते. या संपामुळे ग्राहकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागला. ९ युनियनच्या युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनने या संपाची नोटीस दिली होती. या संपामुळे नोकरदार, पेन्शनर, शेतकरी, उद्योग, व्यापार क्षेत्रातील सर्वांनाच फटका बसला. बुधवारी बँक कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन केंद्र सरकारच्या धोरणाचा जाहीर निषेध नोंदविला. देशभरातील ५ हजार ५०० शाखांतील कामकाज बंद असल्याची माहिती यावेळी संपकर्त्या कर्मचाºयांनी दिली.आॅनलाईन ट्रान्झेक्शनचा आधारमागील काही वर्षांत बँकांच्या आॅनलाईन व्यवहारांवर अधिक भर देण्यात आला आहे. यामुळे बऱ्यांच नागरिक या व्यवहारांना पसंती देताना दिसतात. अधिकृत व्यवहार आॅनलाईनच्या माध्यमातून सुरळीत पार पडत आहेत. रोख रकमेचे काम नसलेल्या नागरिकांनी दोन दिवस धनादेश व रोखीचे व्यवहार टाळून इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींगसह अन्य पर्यायांच्या माध्यमातून देवाण-घेवाण पूर्ण केल्याचे दिसून आले.

टॅग्स :Strikeसंप