शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

सात सामन्यांत खेळाडूंचे उत्तम प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 23:16 IST

न.प. व खो-खो प्रेमी यांच्या सहकार्याने आयोजित पालकमंत्री चषक विदर्भ राज्यस्तरीय महिला, पुरूष खो-खो सामन्यांचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता झाले. तत्पूर्वी क्रीडा ज्योत मशाल रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देपालकमंत्री चषक : विदर्भ राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : न.प. व खो-खो प्रेमी यांच्या सहकार्याने आयोजित पालकमंत्री चषक विदर्भ राज्यस्तरीय महिला, पुरूष खो-खो सामन्यांचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता झाले. तत्पूर्वी क्रीडा ज्योत मशाल रॅली काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी स्मीता पाटील, न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करण्यात आले. शुक्रवारी झालेल्या सात सामन्यांत खेळाडूंनी खेळाचे उत्तम प्रदर्शन घडविले.कार्यक्रमाला खा. रामदास तडस, आ.डॉ. पंकज भोयर, भाजप जिल्हा अध्यक्ष राजेश बकाने, डॉ. शिरीष गोडे, नगराध्यक्ष अतुल तराळे, उपाध्यक्ष प्रदीप ठाकुर, माजी नगरसेवक भाटीया, सर्व गटनेते उपस्थित होते. प्रास्ताविक तराळे यांनी करीत आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. आ.डॉ. भोयर यांनी नगर परिषद प्रशासन व आयोजन समितीचे कौतुक करून स्पर्धेकरिता न.प. निधीद्वारे १० लाख रुपयांची तरतूद केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. बकाने व डॉ. गोडे यांनी मार्गदर्शन केले. खा. तडस यांनी क्रीडा क्षेत्राला पुनरवैभव प्राप्त करून देण्यास्तव खो-खो या मैदानी खेळाची स्पर्धा घेतल्याबद्दल नगर परिषद तथा प्रमुख आयोजक माजी खो-खो खेळाडू अतुल तराळे व टीमचे कौतुक केले. महाराष्ट्राच्या मातीतील अन्य खेळांच्या स्पर्धाही आयोजित कराव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली.विदर्भ खो-खो असो.चे सचिव सुधीर निंबाळकर, सहसचिव संजय इंगळे उपस्थित होते. क्रीडा क्षेत्रातील माजी खेळाडू, प्रशिक्षक, संघटक व पालकांचा क्रीडा जीवनगौरव सन्मानाने सत्कार करण्यात आला. न.प.द्वारे मधुकर बेले, मुरलीधर फाले, मदन तळवेकर, विनोद हांडे, जया बोटकुले, किरण नखाते यांना सन्मानित केले गेले. शुक्रवारी पुरुष, महिला गटातील सात सामने खेळविण्यात आले.काटोल संघाची आगेकूचमहिला गटात नवजयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ व रामनगर स्पोर्टींग क्लब वर्धा यांच्या सामन्यात नवजयहिंदने डाव व ४ गुणांनी, विदर्भ युवा क्रीडा मंडळ काटोल व चंद्रपूर संघाच्या सामन्यात काटोलने दोन गुणांनी, उदय क्रीडा मंडळ चांदुरबाजार व सहयोग प्रसारक मंडळ वर्धा या पुरूषांच्या सामन्यात उदयने एका गुणाने, विदर्भ युथ काटोल व तुळजाई खल्लार यांच्यातील सामन्यात काटोलने १ गडी व ५.४० मिनिटे राखून, विदर्भ क्रीडा मंडळ काटोल व चंद्रपूर संघाच्या सामन्यात काटोलने डाव व एक गुणाने, तुळजाभवानी परतवाडा व नवमहाराष्ट्र नागपूर यांच्यातील सामना परतवाडाने एक गडी व सहा मिनिटे तर ह्युमॅनिटी स्पोर्टींग क्लब परतवाडा व जयहिंद पचखेडी या महिलांच्या सामन्यात परतवाडा संघाने एक डाव व दोन गुणांनी विजय प्राप्त केला.