शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानी करतात पाण्याचे उत्कृष्ट नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 23:57 IST

माहेश्वरी समाजाचे मूळ राजस्थान असून देशातील विविध प्रांतात तो विखुरलेला आहे. राजस्थानात पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठे आहे. असे असतानाही राजस्थानी नागरिक पाण्याचे उत्कृष्ट नियोजन करतात. पुरातन विहिरी, बावडी त्यांचीच देण आहे.

ठळक मुद्देसचिन पावडे । माहेश्वरी मंडळाद्वारे वंशोत्पत्ती दिनानिमित्त पाणीसमस्येवर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : माहेश्वरी समाजाचे मूळ राजस्थान असून देशातील विविध प्रांतात तो विखुरलेला आहे. राजस्थानात पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठे आहे. असे असतानाही राजस्थानी नागरिक पाण्याचे उत्कृष्ट नियोजन करतात. पुरातन विहिरी, बावडी त्यांचीच देण आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेत प्रत्येकाने पाण्याचा थेंब अन् थेंब जमिनीत जिरवावा, भविष्यातील जलसंकटावर मात करावी, असे आवाहन वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष, जलदूत डॉ. सचिन पावडे यांनी केले.माहेश्वरी मंडळाद्वारे समाजाच्या ५१५२ व्या वंशोत्पत्ती दिनाच्या औचित्याने जलसंकटावर व्याख्यान, रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.डॉ. पावडे म्हणाले, भूगर्भातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला जात आहे. दुसरीकडे सिमेंट रस्ते, पेव्हिंग ब्लॉक यामुळे पाणी जमिनीत न जिरता थेट वाहून जाते. यामुळेच जलसंकट गडद होत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. जलबचतीकरिता जलपुनर्भरणाचे महत्त्व विशद करून प्रत्येकाने याकरिता पुढाकार घ्यावा, असे सांगितले. यावेळी परमानंद तापडिया यांच्या हस्ते डॉ. पावडे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.व्याख्यानापूर्वी लोकेश कुलधरिया, प्रकाश राठी यांच्या संयोजनात आयोजित शिबिरात ४० जणांनी रक्तदान केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा ओमप्रकाश पसारी, हर्षा टावरी, सूर्यप्रकाश गांधी, दामोदर दरक, मदनलाल मोहता, अमित टावरी, हरीश टावरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नितीन मुंदडा यांच्या नेतृत्वात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. यात समाजबांधवांचा मोठा सहभाग होता. यात्रेतून बालकांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. शोभायात्रेदरम्यान ‘जय महेश’च्या घोषणेने आसमंत निनादला होता. महेश रथावर शिवपार्वती विराजमान होते. मंडळाचे समन्वयक राजकुमार जाजू यांनी प्रास्ताविक, तर संचालन गीतेश चांडक यांनी केले. उमेश टावरी यांनी आभार मानले. आयोजनाकरिता संजय टावरी, प्रशांत तापडिया, विनोद राठी, अजय गांधी, चेतन लढ्ढा, अमित गांधी, विजय राठी, दीपा टावरी, दिव्या मोहता, राजेश टावरी, मुकुल भुतडा, ओम केला, आशीष पनपालिया आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Waterपाणी