शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थ्यांना घरकूल अनुदानाची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:00 IST

पंतप्रधान आवास योजनेतून मंजूर झालेल्या घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. परंतु, अनुदानाची रक्कम देण्यास ग्रामपंचायतकडून हेतुपुरस्पर टाळाटाळ होत असल्याची तक्रार बिरीम फिरंता वर्मा यांनी आर्वी पं.स.चे गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान आवास योजनेतून मंजूर झालेल्या घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कटाकरखेड : पंतप्रधान आवास योजनेतून मंजूर झालेल्या घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. परंतु, अनुदानाची रक्कम देण्यास ग्रामपंचायतकडून हेतुपुरस्पर टाळाटाळ होत असल्याची तक्रार बिरीम फिरंता वर्मा यांनी आर्वी पं.स.चे गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. तात्काळ अनुदानाची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.सदर लाभार्थीला घराचे बांधकाम करण्यासाठी पंचायत समिती अंतर्गत पंचवीस हजार रुपयांचा प्रथम चेक उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यामुळे वर्मा यांनी घराच्या बांधकामाला सुरूवात केली. घराचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी ही रक्कम अपूरी पडत असल्याने वर्मा यांनी काही निकटवर्तीयांकडून रक्कम उसणवारीवर घेतली. इतकेच नव्हे तर त्यांनी घराच्या बांधकामासाठी लागणारे काही साहित्य उधारही घेतले होते. उसनवारी पैसे व उधारीच्या साहित्यावर सध्या घराचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी अद्यापही वर्मा यांना शासनाकडून घर बांधकामासाठी मिळणारी अनुदानाची रक्कम मिळालेली नसल्याने ती मिळावी या आशेने वर्मा यांनी ग्रामसेविका मेघा कोळी यांना माहिती देण्यात आली. परंतु, चार महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्यापही ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने अनुदानाची रक्कम देण्यात आलेली नाही. आर्वी पं. स. कार्यालयात विचारणा केली असता घर बांधकामाचे छायाचित्रच संबंधित बेबसाईडवर अपलोड झाले नसल्याचे सांगण्यात आले. ग्रा.पं. प्रशासनाकडून होत असलेली टाळाटाळ व होत असलेला त्रास लक्षात घेता तात्काळ घरकुलाचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.