शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

युवा पिढीने नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:00 IST

आजच्या तरुण पिढींनी केवळ नोकरीच्या मागे न लागता कौशल्य हस्तगत करुन स्वयंरोजगार उभारावा. आणि इतरांना स्वयंरोजगारामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी....

ठळक मुद्देपंकज भोयर : प्रशिक्षण व रोजगार मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आजच्या तरुण पिढींनी केवळ नोकरीच्या मागे न लागता कौशल्य हस्तगत करुन स्वयंरोजगार उभारावा. आणि इतरांना स्वयंरोजगारामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी, असे प्रतिपादन आ.डॉ. पंकज भोयर यांनी आर. जी. भोयर औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे प्रशिक्षण व रोजगार मेळाव्यात केले.जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाच्यावतीने आयोजित मेळाव्यात व्यासपीठावर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी उमेश खारोडे, पनवेलच्या एल.अ‍ॅन्ड टी. कन्सट्रक्शन स्किल ट्रेनिंग इंन्स्टिटयुटचे प्राचार्य तेजराव पाटील, विशाल रांगणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व मुख्याध्यापक उपस्थित होते.आ. भोयर पुढे म्हणाले, आपण सुद्धा तुमच्या सारखा आहे. पासपोर्ट फोटोचे कव्हर तयार करुन जिल्ह्यात प्रत्येक फोटो स्टुडिओमध्ये जावून विकण्याचा स्वयंरोजगार आपण केला. तसेच विद्यार्थ्यांनी अमली पदार्थापासून दुर राहुन निरंतर शिस्तिने स्वत:चे ध्येय गाठावे. कौशल्य विकासाची प्रेरणा प्रामुख्याने महात्मा गांधींनी वर्धा जिल्ह्यात प्रथम दिली. वर्धा जिल्हा हा कौशल्य विकासाचा पायोनियर जिल्हा आहे, असे सांगितले.मेळाव्याच्या माध्यमाने एच. एस. सी. व्होकेशनल अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची तथा रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या संधीचे युवकांनी सोनं करुन प्रशिक्षणाचा व रोजगाराचा लाभ घ्यावा असे यावेळी खारोडे यांनी सांगितले. मेळाव्याचा लाभ ५०० च्यावर तरुणांनी घेतला.कार्यक्रमादरम्यान एल. अ‍ॅन्ड टी कंपनीने वय, वजन व अभ्यासक्रम तपासून ३०० युवकांना नियुक्ती पत्र देऊन १ एप्रिल पासुन प्रशिक्षण तथा रोजगाराला हजर राहण्यासाठी कळविले. कार्यक्रमाला प्राचार्य रहमतकर, हांडे, बोरकर, चौधरी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सिमा महाजन यांनी केले तर आभार विशाल रांगणे यांनी मानले.