शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वॉर्डनच्या बदलीनंतर आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 22:28 IST

येथील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थीनींनी महिला वॉर्डनच्या अनियमित व अरेरावी वागणाऱ्या संदर्भात शुक्रवार विद्यार्थ्यांनी वसतीगृहाच्या फाटकाला कुलूप लावून गेटसमोर ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देशासकीय वसतिगृहातील मुलींच्या आंदोलनाला यश

ऑनलाईन लोकमतकारंजा (घा.) : येथील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थीनींनी महिला वॉर्डनच्या अनियमित व अरेरावी वागणाऱ्या संदर्भात शुक्रवार विद्यार्थ्यांनी वसतीगृहाच्या फाटकाला कुलूप लावून गेटसमोर ठिय्या आंदोलन केले. याची दखल वरिष्ठांनी तात्काळ निर्णय घेत या वसतिगृहाच्या अधीक्षकाची बदली केली.शुक्रवारी सकाळी ९ वाजतापासून दुपारी १ वाजेपर्यंत या अघिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करीत अन्नाचा कणही घेतला नाही. याची माहिती मिळतारच दुपारी नागपूरच्या वरिष्ठ अधिकाºयांनी वसतिगृह गाठले. आणि महिला वॉर्डन वनीता येलकर यांना बदली केल्याचे लेखी कळविले. यानंतरच मुलींनी कुलूप काढून वसतीगृहात प्रवेश केला. तोपर्यंत महिला वॉर्डनला बाहेर उभे ठेवले. परीक्षेचा काळ सुरू असताना शिक्षण क्षेत्रात असा गोंधळ घडावा, याबाबत सर्वत्र चर्चा होत आहे.कारंजा येथे २००९ ला शिक्षक कॉलनीचे बाजूला एका मंगल कार्यालयात मुलीचे शासकीय वसतीगृह भाड्याने सुरू आहे. येथे एकूण ७७ विद्यार्थिनी आहेत. व्यवस्थापन पाहण्याकरिता महिला वॉर्डन व लिपीक आहे. महिला वॉर्डन सकाळी येते आणि सायंकाळी ५ वाजता नागपूरला निघून जाते हा तिचा नित्यक्रम आहे. वसतीगृहातील मुलींना रात्रभर रामभरोसे वाºयावर सोडून दिले जाते. तसेच येथे अनेक समस्या आहे. या समस्या व वागणुकीबद्दल अनेकवार वरिष्ठांकडे नागपूरला तक्रार करण्यात आली, पण कारवाई झाली नाही.२२ फेबु्रवारीला काही मुलींनी नागपूरला जावून ७७ निवेदन, वरिष्ठ अधिकाºयांना दिले. होस्टेल वॉर्डन वनीता येलकर यांची त्वरीत बदली करण्याची मागणी केली. याकडे दुर्लक्ष झाल्याने नाईलाजाने २३ फेबु्रवारीला सर्व मुलींनी एकत्र येवून वसतीगृहाच्या गेटला कुलूप लावून आंदोलन केले. वॉर्डनला बाहेरच ठेवले. माहिती मिळताच नागपूर समाजकल्याण विभागाच्या प्रकल्प अधिकारी मीना मेश्राम व एस.एच.माटे यांनी वसतिगृह गाठत मुलींच्या समस्या व मागण्या ऐकून घेत वॉर्डनची बदली करण्याचा निर्णय घेतला.