शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:52 IST

प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. आज सहाव्या दिवशी शिवसेनेच्या मध्यस्तीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना आश्वासन दिले. त्यानंतर शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे यांच्याहस्ते उपोषणाची सांगता करण्यात आली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन : अशोक शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडविले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते.आज सहाव्या दिवशी शिवसेनेच्या मध्यस्तीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना आश्वासन दिले. त्यानंतर शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे यांच्याहस्ते उपोषणाची सांगता करण्यात आली.प्रकल्पग्रस्तांना नोकरी सामावून घेण्याचे आश्वासन शासनाने दिले होते.परंतू नोकरीच्या प्रतिक्षेत युवकांचे वय निघून गेल्याने ते अद्यापही बेरोजगार आहेत. त्यामुळे नोकरीची अट काढून २५ लाख रुपये देण्यात यावे, तसेच प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र, जमिनीचा सातबारा, जमिनीचे पट्टे देण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषण सुरु केले होते. या उपोषणात देवेन्द्र हिवरकर, रवींद्र चाफले, आकाश निस्ताने, सुनिल शेंडे, वैभव ठाकरे या प्रकल्पग्रस्तांचा समावेश होता. दररोज उपोषणकर्त्यांची संख्या वाढतच होती. आज सहाव्या दिवशी उपोषकर्त्यांची संख्या १४ वर पोहचली होती. दरम्यान वैभव ठाकरे, सुनील शेंडे व आकाश निस्ताने या तीन उपोषकर्त्याची प्रकृती खालावल्याने त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपोषण सुरु असतांनाच झालेल्या पावसाची तमा न बाळगता आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी उपोषण सुरुच ठेवले. नुकताच पार पडलेला रक्षाबंधनाचा सणही या प्रकल्पग्रस्तांनी याच उपोषण मंडपात साजरा केला. या प्रकल्पग्रस्तांना अनेकांनी पाठींबा जाहीर करीत उपोषण मंडपाला भेटी दिल्या. तसेच इतरही प्रकल्पग्रस्तांनी या मंडपात येऊन आपल्या व्यथा मांडल्या. दरम्यान काँग्रेसचे शहरअध्यक्ष सुधीर पांगूळ, शेतकरी आरक्षणचे शैलेश अग्रवाल आणि शिवसेनेचे उपनेते उपनेते तथा माजी मंत्री अशोक शिंदे, जिल्हा प्रमुख राजेश सराफ यांच्यासह शिवसैनिकांनी उपोषकर्त्यांची भेट घेऊन पाठींबा जाहीर केला. तसेच मागण्या मंजूर करुन घेईपर्यंत सहकार्य करणार असल्याचे आश्वासनही यावेळी उपोषणकर्त्यांना दिले होते. यावेळी अनेकांनी मार्गदर्शन करुन आजी-माजी शासनाने प्रकल्पग्रस्तांची पिळवणूक केली.भाजपच्या नेते ेमंडळींनी फक्त आमचं भांडवल करून मोठ्या प्रमाणात आमची मते लाटली असा आरोप करण्यात आला. तसेच यापुढे गैरफायदा घेणाºयांना संधी देणार नसल्याचा इशाराही या मंडपातून देण्यात आला.प्रकल्पग्रस्तांच्या समस्या निकाली काढाव्या यासाठी आजवर अनेक आंदोलने करण्यात आली व या आंदोलनांची, उपोषणांची सांगता करतांनी तत्कालीन विरोधी आणि आजचे सत्ताधारी देवेन्द्र फडणवीस आझाद मैदानवर बोलले होते की हे सरकार ऐकणार नाही. आपले सरकार आणा चुटकी सरशी समस्या निकाली काढू. याच प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना व तटकरेंना २० स्मरणपत्रे देणारे आजचे वित्तमंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार याविषयी कानाडोळा करत असल्याचा आरोप यावेळी प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष राजेश शिरगरे यांनी केला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश सराफ यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांबाबत विविध मागण्यांसदर्भात चर्चा केली. त्यावेळी जिल्हाधिकाºयांनी प्रकल्पग्रस्तांच्या कामात येणाºया प्रशासकीय अडचणी तात्काळ दूर करून स्वत: लक्ष घालून सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर या उपोषणाची सांगता करण्यात आली. मागण्या न सोडविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.सहाव्या दिवशी झाली उपोषणाची सांगताप्रशासनिक व स्थानिक अडचणी दूर करून प्रकल्पग्रस्तांच्या प्रमाणपत्र, ७/१२, भूखंड वाटप आदी प्रश्नांवर सहकार्य करणार असल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनावर प्रकल्पग्रस्तांनी विश्वास ठेवण्यास हरकत नसावी. धोरणात्मक विषय त्यांच्या अखत्यारीत नसून शासकीय इच्छाशक्तीचा भाग आहे. यावर तोडगा काढण्याचा अधिकार फक्त धोरण आखण्याची सक्षमता असणाºया शासनकर्त्यांकडे आहे. धोरण आखण्यासाठी मुख्यमंत्र्यांची इच्छाशक्ती आवश्यक असते. शिवसेना कायम प्रकल्पग्रस्तांच्या सोबत असल्याचे मत शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे व्यक्त केले व आपण प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न शासन दरबारी लावणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.