शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

कंत्राटदारांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:08 IST

वर्धा जिल्हा कंत्राटदार संघटना व सुशिक्षीत बेरोजगार अभियंता संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी सा.बा.वि.च्या कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत साखळी उपोषण अखेर आंदोलनकर्त्या कंत्राटदारांनी मागे घेतले. त्यांच्या मागण्यांपैकी सहा मागण्यांवर चर्चा करून योग्य तोडगा काढण्यात आल्याने हे आंदोलन सोमवारी मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देविविध मागण्यांवर निघाला तोडगा : अनेक मागण्या केल्या मान्य

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्हा कंत्राटदार संघटना व सुशिक्षीत बेरोजगार अभियंता संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी सा.बा.वि.च्या कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत साखळी उपोषण अखेर आंदोलनकर्त्या कंत्राटदारांनी मागे घेतले. त्यांच्या मागण्यांपैकी सहा मागण्यांवर चर्चा करून योग्य तोडगा काढण्यात आल्याने हे आंदोलन सोमवारी मागे घेण्यात आले.कंत्राटदाराच्या आंदोलनाची दखल घेवून विविध विभागात मागील काही दिवसांपासून अधिकाऱ्यांमध्ये मागण्या कशा पूर्णत्त्वास नेता येईल यासाठीची चर्चा होत होती. ४४ दिवसांच्या साखळी उपोषणादरम्यान आंदोलनकर्त्या कंत्राटदारांनी थाळी वाजवून व भजन सादर करून विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. शिवाय विविध मागण्यांचे निवेदन मंत्र्यांसह संबंधीत विभागातील अधिकाºयांना सादर करण्यात आले. त्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक चर्चा होऊन सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे प्रलंबित देयके आदिवासी ५०५४ (३) ५०५४ (०४), ३०५४ (ए.एम.सी), आदिवासी (टि.एस.पी) या लेखशिर्षांतर्गत प्रलंबित निधी देण्यात आले. जि.प. बांधमाक विभाग २५१५ विशेष निधीचे देयके आठ दिवसात देण्याचे आश्वास देण्यात आले आहे. तर जि.प. लघु सिंचन विभागातर्फे तीन वर्षांपासून कारंजा येथील उमरी तलावाचे प्रलंबित देयके दुसºया फंडातुन देण्याचे आश्वासन दिले आहे. शिवाय आदिवासी (टि.एस.पी) इमारतीचा निधी अजुनपर्यंत देण्यात आला नव्हता तो देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर कंत्राटदाराना क्रॅशर सॅन्ड वापरण्याची परवानगी देण्यात आली. आदिवासी व महसूल विभागाच्या कामाची रक्कम डिपॉझीट झाल्याशिवाय निविदा काढणार नाही. ३० लाखपर्यंत कामावर अटी व शर्ती ही अट काढण्यात आली. लहान कामाचे कल्बींग करण्यात येणार नसल्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. आदिवासी अंतर्गत इमारतीच्या कामांच्या निधी १ महिण्यात देण्याचे आणि इंशुरन्सचे कार्यालय नागपूर मध्ये महिण्यात देण्याचे आश्वासन देण्यात आल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.सोमवार १४ जानेवारीला या साखळी उपोषणाची सांगता कार्यकारी अभियंता टाके, कार्यकारी अभियंता तेलंग, कार्यकारी अभियता गहलोत, विदर्भ कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष जयंत मामीडवार, विदर्भ कंत्राटदार संघटनेच उपाअध्यक्ष अरविंद वाढोणकर, किशोर मिटकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.याप्रसंगी मुन्ना झाडे, प्रणव जोशी, राजेश नासरे, रवी एकापुरे, राजेश हाडोळे, विजय घवघवे, रमेश भगत, प्रशांत घोटे, अमोल क्षीरसागर, दीपक पांगुळ, फिरोज शेख, विनोद भाटिया, राजेश सराफ, सुनील बांसु, सारंग चोरे, हेमंत नरहरशेट्टीवार, रंजित मोडक, बाबा जाकिर, अमर कदम, संजय बोबडे, किशोर पघडाल, प्रमोद घालनी, मंगेश जगताप, अजय पाल, अशोक निकम, अशोक चंदनखेडे, शकील खान, चंदु होरे आदींची उपस्थिती होती.