शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

उच्चपदस्थ होऊन भविष्यात देशाचे चांगले नागरिक व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 06:00 IST

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन उच्चपदस्थ होण्यासाठी प्रयत्न करावेत आणि भविष्यात देशाचे चांगले नागरिक व्हावे, असे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सालोडच्या वतीने सदगुरू सदानंद मठ येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

ठळक मुद्देरामदास तडस : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्यावतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व मान्यवरांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांनी भविष्याचा विचार करून आपले ध्येय निश्चित करावे. परीक्षेमध्ये केवळ टक्केवारी मिळविण्यासाठी धडपडू नका. आपल्या आसपास जे चांगले आहे, ते घेण्याचा प्रयत्न केल्यास जीवनात यश मिळते. यासाठी आपण सर्वांनी प्रत्येक समाजातील थोर पुरुष व यशस्वी मान्यवरांचे चरित्र अभ्यासले पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन उच्चपदस्थ होण्यासाठी प्रयत्न करावेत आणि भविष्यात देशाचे चांगले नागरिक व्हावे, असे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सालोडच्या वतीने सदगुरू सदानंद मठ येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधवानंद महाराज मठाधिपती, सालोड होते. माजी खासदार सुरेश वाघमारे, शेखर शेंडे, राजू तिमांडे, जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, सभापती सोनाली कलोडे, जि.प. सदस्य पंकज सायंकार, पडेगावचे सरपंच अनंता हटवार, नेरीचे सरपंच धनराज टुले, पं.स.सदस्य सुविता मुते, उपसरपंच अजय झाडे, उपसरपंच रवी राऊत, शरयू वांदिले, यशवंत वांदिले, गुलाब तडस, रूपराव सावरकर, वासुदेव जुडे, वंदना वांदिले, शालिनी वैतागे, जयश्री झाडे, अशोक कलोडे, निळकंठ पिसे, किशोर गुजरकर, नितीन साठोणे, सुधीर चाफले, चंदू चामटकर, जगन्नाथ लाकडे, देवा निखाडे उपस्थित होते.खासदार रामदास तडस व अनेक वर्षांपासून गावातील समाजातील मुलांना नि:शुल्क शिक्षण देणारे प्रा. रमेश हागे, प्रा. धर्मेश झाडे यांचा सत्कार करण्यात आला. सालोड येथील ३५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन सालोड येथील ग्रामस्थांनी केले.यावेळी माधवानंद महाराज मठाधिपती, माजी खासदार सुरेश वाघमारे, शेखर शेंडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले तर संचालन धर्मेश झाडे, संदीप रघाटाटे, अनुप झाडे यांनी केले. आभार रमेश आगे यांनी मानले.कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता कृष्णाजी मुते, हरीश तडस, ताराचंद सावरकर, विनोद महाकाळकर, विनोद फटिंग, दिगांबर खोडनकर, सुनील रघाटाटे, सुधीर वैतागे, नरेंद्र धानकुटे, शुभम ढोक, धीरज झाडे, बंडू सागरे, संजय लाडेकर, रवी ढोक, विवेक हजारे, राजू पेटकर, अवधूत सातपुते, अनुप झाडे, आशित वांदिले, बळवंत तेलरांधे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस