शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सौंदर्यीकरण अडकले प्रदूषणाच्या गर्तेत

By admin | Updated: August 13, 2016 00:41 IST

आॅपरेशन वॉश आऊट मोहिमेंतर्गत जप्त केलेल्या ड्रामांचा उपयोग वाहतूक सुरळीत करण्यासाठी होत आहे.

आर्वी नाका चौकात सर्वत्र प्लास्टिकच्या चिंध्या : पालिकेने कठोर कारवाई करण्याची गरज वर्धा : आॅपरेशन वॉश आऊट मोहिमेंतर्गत जप्त केलेल्या ड्रामांचा उपयोग वाहतूक सुरळीत करण्यासाठी होत आहे. या ड्रामांच्या सभोवताल काही संघटनांनी काही दिवसांपूर्वी जाहिरीती लावल्या तर प्लास्टिक गुंडाळले. आजघडीला या जाहिराती व प्लास्टिकच्या चिंध्या झाल्या आहेत. त्यामुळे आर्वी नाका चौकाचे विद्रूपिकरण होत आहे. शहरातील महत्वाचा चौक असलेल्या आर्वी नाका चौकातही ड्राम ठेवण्यात आले. या ड्रामांचा उपयोग वर्षभरापूर्वी काही समाजसेवी संघटनांनी कल्पकतेने करीत सदर ड्रामांवर जनजागृतीपर संदेशाचे फलक लावले. परंतु रामनवमी उत्सवात काही धार्मिक संघटनांनी सदर ड्रामांवर पूर्णपणे भगव्या रंगाचे प्लास्टिक गुंडाळले. त्यामुळे चौकाला काहीशी शिस्तबद्धता आली. परंतु हळूहळू प्लास्टिकचा रंग उडायला लागला. उन्ह, वारा यामुळे प्लास्टिक फाटून त्याचे तुकडे इतरत्र पसरू लागले. आजही हा प्रकार आर्वी नाका परिसरात सुरू आहे. त्यामुळे या चौकाचे विद्रूपिकरण होत आहेच पण प्लास्टिक इतरत्र पसरून प्रदूषणही होत आहे. ज्या संघटनेने असे प्लास्टिक ड्रामांना गुंडाळले त्यांना तर प्रदूषणाचा मुद्दा गावीही नसेल. त्यामुळे पालिकेनेचे पुढाकार घेत प्लास्टिक काढून यानंतर असे प्लास्टिक गुंडाळण्यास मज्जाव करणे गरजेचे आहे. तशी मागणीही नागरिकांद्वारे होत आहे.(शहर प्रतिनिधी) प्लास्टिक फाटून पसरली लक्तरे रामनवमीला आर्वी नाका चौकातील ड्रामांना एका संघटनेद्वारे भगव्या रंगाचे प्लास्टिक गुंडाळण्यात आले. अल्पावधीतच उन्हामुळे सदर प्लास्टिकचा रंग उडून ते फाटायला लागले. खरे पाहता रामनवमी उत्सव संपल्यावर सदर संघटनेने प्लास्टिक स्वत:च काढून त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे होते. असे न झाल्यामुळे सदर प्लास्टिक फाटून त्याची लक्तरे रस्त्यांवर लोंबकळत आहे. प्लास्टिक पुढे जाऊन खराब होऊन प्रदूषण होईल हा मुद्दा संघटनेच्या कार्यकत्यांनी लक्षात घेतला नाही. तसेच पालिकेची परवानगी घेतली का हा मुद्दाही उपस्थित होत आहे.