शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला

By admin | Updated: August 2, 2016 01:06 IST

तालुक्यातील जंगलव्याप्त भागात असलेल्या अस्वलामुळे शेतकरी भयग्रस्त झाले आहेत. यातच

आष्टी (शहीद) : तालुक्यातील जंगलव्याप्त भागात असलेल्या अस्वलामुळे शेतकरी भयग्रस्त झाले आहेत. यातच सोमवारी दुपारी तालुक्यातील मोई येथील प्रल्हाद झिताजी पवार (४५) यांच्यावर अस्वलाने हल्ला चढविला. यात सदर शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. हा दुसरा हल्ला असून सदर घटना तळेगाव वनक्षेत्र अंतर्गत बोटोणा बीटमध्ये घडली. शेतकऱ्यांनी या अस्वलाचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाला केली होती; मात्र त्यांच्याकडून काहीच कार्यवाही झाली नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी वनविभागाच्या कार्यालयावर धडक दिली. मुबारकपूर हा भाग तळेगाव (श्यामजीपंत) येथील वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येतो. मात्र या कार्यालयात अधिकारी नसल्याने आष्टी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एस. जी. परिहार, बीटरक्षक एस.सी. सावंत यांनी त्याला १० हजार रुपयांची प्राथमिक स्वरुपाची मदत देत उपचाराकरिता नागपूर येथे रवाना केले. प्रल्हाद पवार हे शेतात कामासाठी गेले असता अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात तो ६० टक्के जखमी झाले. अस्वलाने त्याच्या पाठीच्या भागाचे अक्षरश: लचके तोडले. त्याच्या डोक्यालाही गंभीर इजा झाल्या आहेत. जखमी अवस्थेत प्रल्हादला कारंजा येथील रूग्णालयात भरती केले. प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने नागपूर येथे हलविण्यात आले. सदर घटना तळेगाव वनक्षेत्र अंतर्गत बोटोणा बीटमध्ये घडली. मात्र आष्टी वनक्षेत्र लागून असल्याने आष्टी वनाधिकाऱ्यांनी तात्काळ उपाय केले. याप्रकरणी मोई गावातील संतप्त शेतकऱ्यांनी आष्टी वनविभगाचे कार्यालय गाठून चांगलाच राडा घातला. ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. अस्वलाच्या भीतीने शेतकरी चांगलेच धास्तावले आहे. वनविभागाने या अस्वलाचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे.(प्रतिनिधी) गत आठवड्यात आष्टी तालुक्यातील माणिकवाडा या गावातील एका गुराख्यावर अस्वलाने तिच्या पिलासोबत हल्ला केला होता. यात गंभीर जखमी झालेल्या त्या गुराख्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या हल्ल्यामुळे गावात दहशतीचे वातावरण असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने पूर्वीच उजेडात आणले होते. असे असताना वनविभागाकडून या अस्वलाचा अद्याप बंदोबस्त करण्यात आलेला नाही.