शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रभावनेचे पुन:स्मरण व्हावे

By admin | Updated: August 8, 2014 00:09 IST

राष्ट्र या शब्दाचा अर्थ अलीकडे आमच्या मनातून पुसत चालला आहे. यास पुनर्जिवित करावे लागणार आहे. याकरिता राष्ट्रकवि मैथीलीशरण गुप्त यांच्या ‘भारत भारती’ यासारख्या काव्याची

वर्धा : राष्ट्र या शब्दाचा अर्थ अलीकडे आमच्या मनातून पुसत चालला आहे. यास पुनर्जिवित करावे लागणार आहे. याकरिता राष्ट्रकवि मैथीलीशरण गुप्त यांच्या ‘भारत भारती’ यासारख्या काव्याची नव्या पीढीस ओळख करून देण्याची अत्यंत गरज आहे. कारण भारत भारतीने देशात लोकचैतन्य निर्माण केले आहे. नव्या पीढिस हा विचार देणे गरजेचे आहे, असे विचार महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलपती डॉ. गिरीश्वर मिश्र यांनी व्यक्त केले. ते महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थान येथे आयोजित समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांनी यावेळी उपस्थित युवकांना राष्ट्रहिताकरिता समर्पण भावाने कार्य करावे, आपली माती व आपल्या भाषेचा स्वाभिमान आपल्याला योग्य मार्गावर नेईल, असे आवाहन केले.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शंकरप्रसाद अग्निहोत्री, दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे डॉ. एस. एस. पटेल, डॉ. सुरज पालीवाल, डॉ. बी. एस. गर्ग , डॉ. पातोंड उपस्थित होते. कार्यक्रमात राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त यांनी रचलेले मंगलचरण सादर केले. प्रकाश ठाकरे व संच यांनी मंगलचरण संगीतबद्ध केले होते. यानंतर झालेल्या काव्यगोष्ठी कार्यक्रमात जिल्ह्यातील कवींनी सहभागी होत आपल्या शब्दशैली व प्रस्तुतीकरणाने श्रोत्यांचे मने जिंकली. कविगोष्ठी ची सुरुवात गुप्त यांची लोकप्रिय रचना ‘चारुचंद्र किरणे..’ गायनाने करण्यात आली. या काव्यसंधेत डॉ. राजेश झा, डॉ. वर्षा पुनवटकर, संजय इंगळे तिगांवकर, अहसान राही, कमलकिशोर शर्मा, महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील डॉ. हरप्रित कौर, डॉ. अनवर सिद्दीकी, गिरडचे आरीफ काझी, हिंगणघाट मुद्गल इब्राहीम बक्श व कोचर गोल्डी, यवतमाळवरून प्रो. ताकसांडे, सेलूचे प्रा. राजेंद्र मुंडे, सेवाग्रामच्या डॉ. सुमन पांडे व डॉ. अनुपमा यांनी सहभागी होत काव्यपाठ सादर केले. यावेळी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमात आयोजन समितीचे प्रमुख डॉ. ओ. पी. गुप्ता यांनी प्रास्ताविकात मागील १७ वर्षापासून सुरू असलेल्या या कार्यक्रमाविषयी माहिती दिली. यावेळी महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थान विद्यार्थी परिषद यांच्यावतीने आयोजित राष्ट्रकवि स्मृति स्वरचित हिन्दी काव्य पाठ स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अनुपमा यांनी केले तर आभार डॉ. दिलीप गुप्ता यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनाला विद्यार्थी, आयोजन समितीचे सदस्य व आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला नागरिक उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)