शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

नैसर्गिक आपत्तीसाठी सज्ज राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 22:05 IST

जीर्ण झालेल्या अत्यंत धोकादायक शासकीय इमारती पावसाळा सुरू होण्यापूर्वी पाडून टाकाव्या. नैसर्गिक आपत्तीत जीव वाचवणारी आवश्यक साधने जसे बोट, लाईफ जॅकेट्स, दोर आदी साधनांची पूरेशी व्यवस्था करण्याससह ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांत औषधांचा पुरेसा साठा करून ठेवावा.

ठळक मुद्देशैलेश नवाल : मान्सूनपूर्व आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जीर्ण झालेल्या अत्यंत धोकादायक शासकीय इमारती पावसाळा सुरू होण्यापूर्वी पाडून टाकाव्या. नैसर्गिक आपत्तीत जीव वाचवणारी आवश्यक साधने जसे बोट, लाईफ जॅकेट्स, दोर आदी साधनांची पूरेशी व्यवस्था करण्याससह ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांत औषधांचा पुरेसा साठा करून ठेवावा. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी करुणा जुईकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुुरूषोत्तम मडावी, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी व विभाग प्रमुख तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर सोनटक्के उपस्थित होते.नैसर्गिक आपत्तीच्या काळात कार्यालयात वीज पुरवठा खंडित झाल्यास काम बंद पडू नये यासाठी नादुरूस्त डिझेल इंजिन कार्यालयाने तातडीने दुरूस्त करून घ्यावे. त्यासाठी निधी आवश्यक असल्यास तत्सम मागणी नोंदवावी. उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांत औषधी साठा, डॉक्टरांची चमू, वीज पुरवठा, इमर्जन्सी आॅपरेशन थिएटर तयार ठेवावे. तसेच रुग्णालयाची तात्पुरती डागडुजी करून घ्यावी. यासाठी रुग्णकल्याण समितीला ५ लाख रुपये देण्यात येतील. हे काम रुग्ण कल्याण समितीने करावे. या सर्व रुग्णालयांची तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी पाहणी करून खातरजामा करावी. ग्रामीण भागात अवैध दारू व्यवसायांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच आपत्ती काळात तत्पर कार्य करण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करावी. मे महिन्याच्या अखेरपर्यंत ग्रामसुरक्षा दल स्थापन करून जूनच्या पहिल्या आठवड्यात तहसीलदारांनी त्यांची बैठक घ्यावी. सर्व विभाग प्रमुखांनी नैसर्गिक आपत्तीच्या काळात जबाबदारीने कामे करावी. हलगर्जीपणा करणाºया अधिकाºयावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही नवाल यांनी बैठकीत सांगितले.