शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! सार्वजनिक स्थळी थुंकणे पडेल १२०० रुपयांत

By admin | Updated: July 20, 2014 00:03 IST

खर्रा, पान खावून जर सार्वजनिक ठिकाणी तुम्ही पचापच थुंकत असाल तर सावधान ! आता हे थुंकणे तुम्हाला १२०० रुपयात पडणार आहे. थुंकण्याच्या या सवईमुळे शासकीय कार्यालयांचे व सार्वजनिक

मुंबई पोलीस अधिनियमाची कलम ११३ लागू गौरव देशमुख - वायगाव(निपाणी)खर्रा, पान खावून जर सार्वजनिक ठिकाणी तुम्ही पचापच थुंकत असाल तर सावधान ! आता हे थुंकणे तुम्हाला १२०० रुपयात पडणार आहे. थुंकण्याच्या या सवईमुळे शासकीय कार्यालयांचे व सार्वजनिक जागांचे विद्रुपीकरण झाले आहे. शिवाय रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने संसर्गजन्य आजारात वाढ झाल्याचे समोर आले आहे. यामुळे राज्य शासनाने सार्वजनिक स्थळी थुंकणाऱ्यांवर आता कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. थुंकणाऱ्यांवर मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ११६ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. क्षयरोग, स्वार्ईन फ्ल्यू, न्यूमोनिया यासारख्या आजाराचा फैलाव होतो़ केंद्र शासनाच्या सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सन २०१२ च्या अहवालानुसार देशातील ३४ लक्षांपैकी राज्यातील ७५ हजार ३१९ नागरिक क्षयरोगाने पीडित आहेत़ या रोगाने भारतातील तीन लक्ष लोक मृत्यूमूखी पडले आहेत. राज्यातील मृतांची संख्या ६ हजार ६९२ इतकी आहे़ सार्वजनिक ठिकाणी थुंकून भिंती खराब होऊन सार्वजनिक मालमत्ता विद्रुप होते़ या भिंती पुन्हा रंगविण्यासाठी जनतेने कर रूपाने दिलेला पैसा खर्च करणे प्रशानाला भाग पडते़ थुंकण्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तर होतेच; पण त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊन कर्करोग, श्वसनाचे आजार पुनरूत्पादन संख्येचे आजार, पंचनसंस्थेचे आजार, या सारख्या प्राणघातक आजाराची लागण होते़ सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे पसरणारे विविध आजार आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी विचारात घेता मुंबई पोलीस अधिनियमाची कलम ११६ नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे.