शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! डेंग्युपासून बचावाकरिता स्वच्छता आणि काळजी महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 23:20 IST

जिल्ह्यात गत आठवड्यापासून डेंग्युने चांगलेच थैमान घातल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात डेंग्युचा उद्रेक : विरूळात चिमुकल्याचा मृत्यू; जनजागृतीसाठी सामाजिक संघटनाही सरसावल्या

आॅनलाईन लोकमतवर्धा : जिल्ह्यात गत आठवड्यापासून डेंग्युने चांगलेच थैमान घातल्याचे चित्र आहे. आर्वी तालुक्यातील विरूळ येथे एका चिमुकल्याचा या आजारामुळे मृत्यू झाला. तर अन्य काही जण उपचार घेत आहेत. याची माहिती मिळताच जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने गावात जात जनतागृती करून नागरिकांवर औषधोपचार सुरू केला आहे. हा आजार होऊ नये म्हणून नागरिकांत जनजागृती गरजेची आहे. वैद्यकीय जनजागृती मंचानेही जनजागृती करणे सुरू केला आहे.डेंग्यु ताप हा विशिष्ट विषाणुमुळे होतो. डेंग्युचा प्रसार हा एडीस इजिप्ती नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठविलेल्या स्वच्छ पाण्यात होते. रांजन, सिमेंटचे टाके, इमारती वरील सिंटेक्स टाके, घराभोवतालच्या टाकावू वस्तू जसे प्लास्टिक बकेट, रिकाम्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या, निरूपयोगी टायर्स, इलेक्ट्रॉनिक्स कचरा, शोभेच्या कुंड्या, फुलदाण्या, कुलर्स, इत्यादीमध्ये साठलेले पाणी यात होत असते. पाणी आठ दिवसापेक्षा जास्त दिवस साठवून ठेवल्यास हा डास अंडी घालतात. यानंतर अळ्यांचे रूपांतर डासात होत असते. त्यासाठी पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवू नये, ही खबरदारी घेणे आवश्यक आहे. सध्या डासाच्या उत्पत्तीला पोषक वातावरण आहे. त्या अनुषंगाने अशा साठविलेल्या पाण्यात एडिस इजिप्ती डास अंडी घालून डासोत्पत्ती होते. सदरहू डासाची उत्पत्ती कमी करणे नियंत्रणात ठेवणे, यासाठी जनतेला आरोग्य शिक्षण देणे आवश्यक असून लोकसहभागाशिवाय डेंग्यु या आजाराचे नियंत्रण शक्य नाही. यामुळे नागरिकांनी वेळीच या आजारावर ताबा मिळविण्याकरिता दिलेल्या उपाययोजना कराव्या असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.डेंग्युची लक्षणेएकाएकी तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, अशक्तपणा, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, तापामध्ये चढ उतार, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली रक्तस्त्राव होणे, रक्त मिश्रीत किंवा काळसर शौचास होणे, पोट दुखणे.घ्यावयाची दक्षताडेंग्यूचा प्रसार करणारे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात वाढतात. आपल्या घराच्या परिसरात साचलेले पाणी तर नाही ना?, जसे कुलर, पाण्याची टाकी, पक्षांचे पिण्याचे भांडे, फ्रिजचा ट्रे, फुलदाणी, नारळाच्यास करवंट्या तुटलेले फुटलेले भांडे व टायर इत्यादीत पाणी राहणार नाही याची दक्षता घ्यावी.पाण्याची भांडी व टाकी झाकुन ठेवावी. कुलर रिकामे करून कोरडे करावे. डेंग्युचा डास दिवसा चावणारा असल्यामुळे संपूर्ण अंग झाकेल असेच कपडे वापरावे. डेंग्युचा उपचारावर विशेष औषधी किंवा लस उपलब्ध नाही.ताप कमी करण्याकरिता पॅरॉसिटामॉल घेता येते. स्वत: एस्प्रिन व ब्रुफेनचा वापर करू नये, डॉक्टराचा सल्ला घ्यावा. डेंग्युच्या प्रत्येक रूग्णास प्लेटलेटची गरज असते. योग्य उपचार योग्य वेळीच घ्या, उपाशा पोटी औषधोपचार घेऊ नका, मांत्रिक व भोंदु-वैद्यांचा सल्ला टाळा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.