शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! डेंग्यू घेतोय कवेत जिल्ह्यात 48 रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 05:00 IST

कोविड संकटातून थोडे सावरत नाही तो सध्या डेंग्यू आपले डोके वर काढत असल्याने आरोग्य विभागाच्या अडचणीत भर पडली आहे. गावागावात डेंग्यू जनजागृती माेहीम राबविली जात असली तरी घराच्या आवारात पावसाचे पाणी साचत असल्याने तसेच स्वच्छ पाण्यात डासांची उत्पत्ती होत असल्याने हा प्रकार डेंग्यूचा प्रसाराचा पोषक ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घराच्या आवारात कुठेही पाणी साचून डासांची उत्पत्ती होत तर नाही ना याची शहानिशा करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देकोरडा दिवस पाळणे फायद्याचे : दक्ष राहण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नवीन कोरोनाबाधित सापडण्याची गती मंदावली असली तरी सध्या डेंग्यू हा कीटकजन्य आजार डोके वर काढू पाहत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४८ डेंग्यू बाधितांची नोंद घेण्यात आली असून एकाचा डेंग्यूने बळी घेतला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत प्रत्येक नागरिकाने दक्ष राहून आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. कोविड संकटातून थोडे सावरत नाही तो सध्या डेंग्यू आपले डोके वर काढत असल्याने आरोग्य विभागाच्या अडचणीत भर पडली आहे. गावागावात डेंग्यू जनजागृती माेहीम राबविली जात असली तरी घराच्या आवारात पावसाचे पाणी साचत असल्याने तसेच स्वच्छ पाण्यात डासांची उत्पत्ती होत असल्याने हा प्रकार डेंग्यूचा प्रसाराचा पोषक ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घराच्या आवारात कुठेही पाणी साचून डासांची उत्पत्ती होत तर नाही ना याची शहानिशा करणे गरजेचे आहे. तर कूलरमधील पाणी नियमित बदलविण्यासह घराच्या आवारात कुठे पावसाचे पाणी साचत असल्यास ते वाहते करणे क्रमप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४८ डेंग्यू बाधितांची नोंद जिल्हा हिवताप अधिकारी विभागाने घेतली असून त्यापैकी एकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. डेंग्यू हा आजार जीवघेणा ठरू शकत असल्याने प्रत्येक नागरिकाने दक्ष राहण्याची गरज आहे.

ही आहेत लक्षणेएकाएकी तीव्र ताप येणे, तीव्र डोकेदुखी, स्नायूदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, अशक्तपणा, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, तापात चढ-उतार, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली रक्तस्राव होणे, रक्तमिश्रित किंवा काळसर शौचास होणे, पोट दुखणे आदी किटकजन्य आजार असलेल्या डेंग्यूची प्राथमिक लक्षणे आहेत.

जिल्ह्यात सध्या डेंग्यू हा कीटकजन्य आजार डोके वर काढू पाहत आहे. सर्व नगरपालिका, नगर पंचायती, ग्रामपंचायती यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत; पण नागरिकांच्या सहकार्याशिवाय डेंग्यूवर नियंत्रण मिळविणे शक्य नाहीच, हे नागरिकांनीही लक्षात घेतले पाहिजे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळल्यास डासांच्या उत्पत्तीला ब्रेक लागेल. त्यामुळे नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. शिवाय आपल्या घराच्या आवारात कुठे डासाची उत्पत्ती तर होत नाही ना, याची शहानिशा करावी.- डॉ. जयश्री थोटे, जिल्हा हिवताप अधिकारी, वर्धा. 

 

टॅग्स :dengueडेंग्यू