शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

वाहन चालविताना कुंटूंबाच्या जबाबदारीचे भान ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 00:23 IST

व्यासपीठावर जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव निशांत परमा, समाज कल्याणचे सहायक आयुक्त अनिल वाळके, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक चौधरी यांची उपस्थिती होती. पुर्वीच्या काळात आजारांनी मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त होते.

ठळक मुद्देरामदास तडस : वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार झालेले महामार्ग दळण-वळणासाठी सोईचे ठरतात. असे असले तरी महामार्गावरील वाढत्या अपघाताचे प्रमाण मात्र चिंताजनक आहे. आजची तरुणाई जोशात वाहने चालवून स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत. तरुणांनी वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करुन जबाबदारीचे भान ठेवावे. स्वत: सोबत कुंटूबीय व इतर व्यक्ती अडचणीत येणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन खा. रामदास तडस यांनी केले.सामाजिक न्याय भवन येथे उपप्रादेशिक परिवहन विभाग व वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने वाहतूक सुरक्षा अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.व्यासपीठावर जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव निशांत परमा, समाज कल्याणचे सहायक आयुक्त अनिल वाळके, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक चौधरी यांची उपस्थिती होती. पुर्वीच्या काळात आजारांनी मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त होते. परंतु, आजच्या काळात अपघाताने मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जगात सर्वात जास्त अपघाताने मुत्यू होण्याचे प्रमाण भारतात आहे. यासाठी भारत सरकारने वाहतुकीच्या नवीन कायद्यासोबतच दंड व शिक्षेतही वाढ केली आहे. या कायद्यातील नियमांचे पालन करुन नागरिकांनी वाहन चालवावे. आपल्यासोबतच दुसऱ्याच्या जीवाचाही विचार करावा असेही यावेळी खा. तडस यांनी स्पष्ट केले. यावेळी मान्यवरांचे हस्ते रस्ता सुरक्षा मार्गदर्शकिचे विमोचन करण्यात आले. प्रास्ताविक विजय तिराणकर यांनी केले तर आभार अशोक चौधरी यांनी मानले.नव्या वाहतूक कायद्याची जनजागृती करा : जिल्हाधिकारीपरिवार हा आयुष्याचा केंद्र बिंदू आहे. आपली एक चूक दुसºयाच्या मृत्यूस कारणीभूत ठरते. विदर्भाच्या महामार्गाच्या तुलनेत सर्वात जास्त महामार्गाची कामे वर्धा जिल्ह्यात सध्या सुरु आहेत. अपघाताचे प्रमाण महामार्गावरील गावाच्या ठिकाणी होत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे महामार्गालगतच्या गावातील नागरिकांनी रस्ता ओलांडताना तसेच वाहन चालविताना दक्ष राहिले पाहिजे. केंद्र शासनाने केलेल्या नवीन वाहतूकीच्या नियमाची संबंधित अधिकाऱ्यांनी स्वत: माहिती घेऊन जनजागृती करावी. अपघातास कारणीभूत ठरल्यास शिक्षा होऊ शकते, याची माहितीही अधिकाºयांनी नागरिकांना पटवून द्यावी, असे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार म्हणाले.अपघाताचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी करणार - तेलीदरवर्षी अपघाताचे प्रमाण दहा टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष शासनाचे आहे. मागील वर्षीच्या तुलनेत वर्धा जिल्ह्यात यंदा ६ टक्के अपघात कमी झाले आहेत. हेल्मेट न वापरणे, सिट बेल्ट न लावता वाहन चालविणे, मद्यप्राशन करुन वाहन चालविणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी व माल लादून वाहतूक करणे तसेच वेगाने वाहन चालविणे या छोट्या-छोट्या बाबी अपघातास निमंत्रण देणाऱ्या ठरतात. यामुळे प्रत्येक नागरिकाने वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी केले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस