शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंरोजगार उभा करुन सक्षम व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:10 IST

ग्रामीण भागातील महिलांनाही न्याय मिळाला पाहिजे. ग्राम स्वराज्याचे स्वप्न पाहणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत.

ठळक मुद्देरामदास तडस : नाचणगाव येथे प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा कार्यक्रम

ऑनलाईन लोकमतपुलगाव : ग्रामीण भागातील महिलांनाही न्याय मिळाला पाहिजे. ग्राम स्वराज्याचे स्वप्न पाहणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्यात ग्राम स्वराज योजना असून महिला बचत गट सक्षम व्हावे, त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे, यासाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना कार्यान्वित केली. या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना व बचत गटांना स्वयंरोजगारासाठी चालना मिळेल. ग्रामीण भागातील महिलांनी स्वयंरोजगार उभा करून सक्षम व्हावे, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी नाचणगाव येथे प्रधानमंत्री मुद्रा बँक प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाच्या प्रसंगी केले.जिल्हा नियोजन समिती वर्धा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा वर्धा, जिल्हा अग्रणी महामंडळ वर्धा यांच्या संयुक्तवतीने नाचणगावच्या सिद्धेश्वर मंदिरात सदर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी मनोहर बाराहाते, देवळी पं.स.च्या सभापती विद्या भुजाडे, जि. प. सदस्य प्रवीण सावरकर, पं. स. उपसभापती किशोर गव्हाळकर, पं. स. सदस्य दिलीप अग्रवाल, दीपक फुलकरी, अरविंद नागतोडे, अनिल पाटील, डॉ. संजय खोपडे, राजेश घोडे, दीपक पिंपरीकर, सिद्धार्थ भोतमांगे आंदीची उपस्थिती होती. यावेळी यशस्वी उद्योजक संध्या कडू, सुनीता मडावी, व अन्य काही महिला उद्योजकांचा तर उल्लेखनिय कार्यासाठी बँक आॅफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक राजेश घोडे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन साटोणे यांनी तर आभार ओमलता दरणे यांनी मानले.आर्वीत तीन युवकांना कर्ज मंजुरआर्वी- जिल्हा नियोजन समिती, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने आयटीआय तसेच एमसीव्हीसी उत्तीण बेरोजगार प्रशिक्षणार्थींसाठी मुद्रा योजना प्रसार आणि प्रचार मेळावा आर्वी येथे गुरुवारी पार पडला. यावेळी गांधी चौक ते सहकार मंगल कार्यालयपर्यंत प्रशिक्षणार्थींची मुद्रा रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचा उद्घाटन आ. अमर काळे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण अधिकारी यु.आर. खारोडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, प्रा. अभय दरभे, व्ही. आर. निबांळकर, डी. एल. गायधनी आदी उपस्थित होते. यावेळी मुद्रा योजनेतंर्गत कर्ज घेतलेले यशस्वी लाभार्थी धनंजय कालभुत, दुर्गा वानखेडे, अमीत अहिव यांचा सत्कार करण्यात आला. योगेश ताजणेकर, मंगेश कोसे, स्वप्नील बोबडे या तीन युवकांना कर्ज मंजुर झाल्याचे बँकेचे पत्र प्रदान करण्यात आले. मेळाव्याच्या दुसऱ्या सत्रात लिड बँकेचे व्यवस्थापक कोहाड, श्रीराम बांधे, मनोज निबार्ते, सुरेश गणराज, युगल रायलू, राकेश कदम आदींनी युवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रफुल क्षीरसागर यांनी केले तर आभार पी. एच. रोकडे यांनी मानले.