शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

डिझाईनसाठी ‘बीडी’चा ‘फंडा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 22:35 IST

गांधी फॉर टुमारो प्रकल्पाचे काम आता कुठे प्रत्यक्ष साकारतेय. २६६.५३ कोटींच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम इमानेइतबारे व्हावे, ....

ठळक मुद्देसेवाग्राम विकास आराखडा : सार्वजनिक बांधकाम विभागाचा अफलातून प्रकार

प्रशांत हेलोंडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गांधी फॉर टुमारो प्रकल्पाचे काम आता कुठे प्रत्यक्ष साकारतेय. २६६.५३ कोटींच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम इमानेइतबारे व्हावे, अशी गांधीजींच्या अनुयायांनी इच्छा आहे; पण गैरप्रकार न करता काम करणार, ते बांधकाम विभाग कसले! डिझाईन मंजूर नसताना, भूमिपूजन व्हायचे असताना कामे सुरू झाली. आता सावरासावर करण्यासाठी महसूल विभागात रूळलेला ‘बॅक डेट’चा फंडा बांधकाम विभाग वापरणार आहे.सेवाग्राम विकास आराखड्याकरिता शासनाने निधी मंजूर केला. यातील काही कामांचे आराखडे तयार करण्यात आलेत तर उर्वरित आराखडे तयार करण्याच्या सूचना २९ आॅगस्ट रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात १४४ कोटी ९९ लाख रुपयांची कामे करण्यात येत आहेत. यासाठी वर्क आॅर्डरही देण्यात आला; पण अद्याप भूमिपूजन करण्यात आले नाही. तत्पूर्वीच कामे सुरू झाली आहेत. कामांचा कालावधी ठरवून देण्यात आला आहे. यामुळे कामे झपाट्याने हाती घेतली असावी, हे समजता येते; पण डिझाईन मंजूर करून न घेताच कामे सुरू करणे योग्य कसे, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर काम करणाºया जे.पी. कंन्स्ट्रक्शन कंपनीच्या संचालकांत चांगलीच घबराट पसरली. बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना त्यांच्याकडून विचारणा केली गेली. यावर बांधकाम विभागाने काम थांबवून डिझाईन मंजूर करून घेणे गरजेचे होते; पण असे न करता बॅक डेटमध्ये डिझाईन मंजूर करून घेऊ, असा उपटसुंभ सल्ला देत कंत्राटदारांच्या गैरप्रकाराला चालना देण्याचे कामच केल्याचे दिसून येत आहे.महसूल विभागात शेतजमिनीची खरेदी केल्यानंतर ले-आऊट मंजुरीकरिता बॅक डेटमध्ये खरेदी दाखविली जाते. असे एक नव्हे तर शेकडो प्रकरणे जिल्ह्यात आहेत. तपासात ही बाब उघड झाल्याने आता कुठे कारवाईसाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. महसूल विभागातील हा प्रकार आता बांधकाम विभागाद्वारे वापरला जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे. यामुळे एकूण कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.भ्रमणध्वनी उत्तर देईनासेवाग्राम विकास आराखड्यातील डिझाईन मंजुरीपूर्वीच सुरू झालेल्या कामाबाबत विचारणा करण्यासाठी कार्यकारी अभियंता शरद चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी उत्तर देत नव्हता. यापूर्वीच्या वृत्तासाठी संपर्क केला असता त्यांनी माझी तब्येत बरी नाही, प्रत्यक्ष भेटा, असे सांगितले होते. काम नियमात आहे तर अधिकाºयांची चुप्पी का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.