शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

एकाच विहिरीचा अनेक कुटुंबांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 22:04 IST

सध्या सूर्यनारायण आग ओकत आहे. त्यातच आदर्शनगरातील नागरिकांना चार दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. अशातच थोडे पाणी असलेली विहीर अनेक कुटुंबाला आधार देणारी ठरत आहे; पण जोरदार पाऊस येत भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासाठी आणखी साडेतीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने तेथील नागरिकांना तीव्र पाणी समस्येला सामोरे जावे लागणार आहे. सध्या काही विहिरी व बोअरवेल कोरड्या झाल्याने पाण्यासाठी महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देआदर्शनगरात पाणीसमस्या ऐरणीवर : महिलांच्या अडचणीत भर

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : सध्या सूर्यनारायण आग ओकत आहे. त्यातच आदर्शनगरातील नागरिकांना चार दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. अशातच थोडे पाणी असलेली विहीर अनेक कुटुंबाला आधार देणारी ठरत आहे; पण जोरदार पाऊस येत भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासाठी आणखी साडेतीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने तेथील नागरिकांना तीव्र पाणी समस्येला सामोरे जावे लागणार आहे. सध्या काही विहिरी व बोअरवेल कोरड्या झाल्याने पाण्यासाठी महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.आदर्शनगरवासियांना सध्या तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यातही चार दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने पाणी साठवून ठेवणार तरी किती असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. सेवाग्राम ग्रा.पं.च्या प्रभाग ३ मधील हा भाग असून कष्टकऱ्यांची वसाहत अशीच या परिसराची ओळख आहे. स्वतंत्र पाणी व्यवस्था असली तरी प्रत्येक उन्हाळ्यात या भागातील नागरिकांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागते. असे असले तरी त्यावर कायमस्वरूपी तोडगा न काढण्यात आल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे.या भागात तीन हॅन्डपंप आहेत. त्यापैकी एक हॅण्डपंप कोरडा झाला आहे. याच भागात एक विहीर असून या एकाच विहिरीवर तब्बल १४ मोटारी बसविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या भागातील रहिवासी इतरांना विहिरीतील पाणी घेऊ देत नसल्याने नागरिकांची समस्या लक्षात घेऊन ग्रा.पं. प्रशासनाने याविषयी लक्ष देण्याची गरज आहे. जलसंकटावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी ग्रा.पं. प्रशासनाने विशेष पाऊल उचलण्याची मागणी आहे.