शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीला ‘ठिबक’ चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2015 02:05 IST

अवर्षण सदृश स्थितीच्या सावटाखाली असलेल्या वर्धा तालुक्यात ४६ हजार ६४३ हेक्टर पेरणी झालेली आहे.

उगविलेले अंकुर करपण्याच्या मार्गावर : दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा वर्धा : अवर्षण सदृश स्थितीच्या सावटाखाली असलेल्या वर्धा तालुक्यात ४६ हजार ६४३ हेक्टर पेरणी झालेली आहे. पावसाने दडी मारल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. असे असतानाच निसर्गाच्या प्रतिकुलतेवर मात करण्याकरिता ४४९ शेतकऱ्यांनी ५६९ हेक्टरावर ठिबक सिंचनाचा प्रयत्न सुरू केला आहे. उपलब्ध असलल्या मर्यादित पाण्याचा वापर करीत निसर्गाच्या प्रतिकुलतेवर मात करण्याचा या माध्यमातून प्रयत्न होत आहे. वर्धा तालुक्यात ५६ हजार हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य असून अपवादात्मक स्थितीत तालुक्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी यापैकी ४६ हजार हेक्टरवर पेरणी केलेली आहे. त्यापैकी २६ हजार ९१० हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा शेतकऱ्यांनी पेरा केला आहे. त्यामुळे आर्थिक पीक म्हणून समजल्या गेलेल्या कपाशीला जगवण्याचा प्रयत्न सध्या शेतकरी कसोशीने करीत आहेत. परिणामी ५६९ हेक्टर वरील कपाशी अवर्षण सदृश स्थितीतही असल्याचे चित्र आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचा आधार मिळाला आहे.(तालुका प्रतिनिधी)तालुक्यात ५६ पैकी ४६ हजार हेक्टरवर पेरण्याजिल्ह्यात असलेल्या ५६ हजार हेक्टरपैकी ४६ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. यात कपाशी २६ हजार ९१० हेक्टर, सोयाबीन १३ हजार ४७० हेक्टर, ज्वारी, मका १२७ हेक्टर, तूर ६ हजार ७६ हेक्टर, मुग ३० हेक्टर, उडीद ३० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात अजून १० हजार हेक्टर पेरा व्हायला आहे.तीन वर्षांपासून वर्धा तालुक्यातील ४४० शेतकरी ५६९ हेक्टरवर ठिंबक सिंचनाने ओलीत करीत आहेत. तर १ हजार ७८७ हजार शेतकरी १ हजार १८८ हेक्टर क्षेत्रावर स्प्रिंकलरचा वापर करून ओलीत करीत आहेत. वर्धा तालुक्यातील ठिंबक व स्प्रिंकलरची स्थितीठिबक सिंचन २०१२-१३शेतकर ११४१४४ हेक्टर क्षेत्रस्प्रिंकलर २०१२-१३शेतकरी ४५२११७ हेक्टर क्षेत्रठिबक सिंचन २०१३-१४शेतकरी १२३१६३ हेक्टर क्षेत्रस्प्रिंकलर २०१३-१४शेतकरी ६४०५४५ हेक्टर क्षेत्रठिबक सिंचन २०१४-१५शेतकरी २०३२६२ हेक्टर क्षेत्रस्प्रिंकलर २०१४-१५शेतकरी ६९५५३६ हेक्टर क्षेत्र