शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मर्चंट नेव्हीच्या नावाखाली वर्धेत बोगस परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:18 IST

येथील सुशील हिंम्मतसिगका विद्यालयात मर्चंट नेव्हीच्या परीक्षेसाठी एकत्रित झालेल्या सुमारे १५० युवकांनी फसवणूक केल्या जात असल्याचा आरोप करीत रविवारी सकाळच्या सुमारास परीक्षा उधळून लावली.

ठळक मुद्देयुवकांचा गदारोळ : शहर पोलिसात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील सुशील हिंम्मतसिगका विद्यालयात मर्चंट नेव्हीच्या परीक्षेसाठी एकत्रित झालेल्या सुमारे १५० युवकांनी फसवणूक केल्या जात असल्याचा आरोप करीत रविवारी सकाळच्या सुमारास परीक्षा उधळून लावली. त्यानंतर या युवकांनी थेट शहर पोलीस ठाणे गाठून सदर घटनेची तक्रार नोंदविली. या प्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नसला तरी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.मर्र्चंट नेव्हीची परीक्षा असल्याचे म्हणत आलेल्या जाहिरातीवरून अनेक युवकांनी या परीक्षेकरिता अर्ज केले. या अर्जानुसार त्यांना मोबाईलवर एसएमएस आले. या सूचनेवरून अनेक युवक वर्धेतील सुशील हिम्मतसिंगका शाळेत असलेल्या परीक्षा केंद्रावर पोहोचले. मात्र, परीक्षा घेणारा रामेश्वर भिकुराव लेकुळे (२२) रा. मुंबई हा युवक परीक्षा केंद्रावर वेळेनंतर पोहोचला. त्याने परीक्षा अर्धातासनंतर सुरू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सदर युवकाने परीक्षार्थ्यांना परीक्षेसाठी लागणारे प्रत्येकी ५०० रुपयांची मागणी केली. दरम्यान काही परीक्षार्थ्यांनी त्याच्यावर संशय आल्याने त्याला ओळखपत्राची व आवश्यक कागदपत्राची मागणी केली.असे कुठलेही कागदपत्र नसल्याचे लक्षात येताच परीक्षार्थ्यांमध्ये रोष वाढला. आपली फसवणुक झाल्याचा आरोप करीत परीक्षार्थ्यांनी परीक्षा उधळून थेट शहर पोलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार नोंदविली. पोलिसांनीही परीक्षार्थ्यांची तक्रार नोंदवून घेत सध्या कुठलाही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नाही. सदर प्रकार काय, त्यात काय सत्यता आहे, याची शहानिशा करूनच गुन्ह्याची नोंद घेण्यात येईल असे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले. या तपासाकडे अनेकांच्या नजरा आहेत.परीक्षा घेणाºयाकडे ओळखपत्रही नाहीपरीक्षा घेणाºया रामेश्वर लेकुळे याच्याकडे तो कुठल्या कंपनीत काम करतो त्याबाबतचा साधा पुरावाही नव्हता. परिणामी, परीक्षार्थ्यांनी आपली फसवणुक केल्या जात असल्याचा आरोप करीत चांगलाच राडा घातला. सायंकाळी उशीरापर्यंत सदर प्रकार काय याची चौकशी पोलिसांकडून सुरू होती.सी अँकर मुंबई या कंपनीसाठी आपण काम करतो. वरिष्ठांच्या आदेशावरून आपण वर्धेत परीक्षा घेण्यासाठी आलो होतो. परीक्षार्थ्यांना आपण परीक्षेसाठी ५०० रुपये सांगितले होते. परंतु, कुणाकडूनच पैसे घेतले नाही. १०० तरुणांची या केंद्रातून परीक्षा घेणे क्रमप्राप्त होते.- रामेश्वर लेकुळे, परीक्षा संयोजक.सदर प्रकरणी परीक्षार्थ्यांची तक्रार घेतली आहे. या संदर्भात अद्याप कोणताही गुन्हा दाखल केला नाही. सध्या चौकशी सुरू आहे.- शुभांगी ताकीत, पोलीस उपनिरीक्षक, शहर पोलीस ठाणे वर्धा.