शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नीतिपूर्ण व्रतांमुळे सुशीला झाल्या बापूंच्या डॉक्टर कन्या

By admin | Updated: December 25, 2014 23:36 IST

स्वातंत्र्यापूर्वी व नंतर आरोग्यावरील डॉ़ सुशीला नय्यर यांचे कार्य उल्लेखनीय आहे. डॉक्टर असल्याने बापूंनी त्यांच्याकडे आरोग्याची जबाबदारी सोपविली. बापूंच्या विश्वासास त्या खऱ्या उतरल्या.

दिलीप चव्हाण - सेवाग्रामस्वातंत्र्यापूर्वी व नंतर आरोग्यावरील डॉ़ सुशीला नय्यर यांचे कार्य उल्लेखनीय आहे. डॉक्टर असल्याने बापूंनी त्यांच्याकडे आरोग्याची जबाबदारी सोपविली. बापूंच्या विश्वासास त्या खऱ्या उतरल्या. आरोग्य सेवेचे अखंड व्रत त्यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत सांभाळले. त्यांच्या ध्येय व नीतिपूर्ण व्रतांमुळे त्या बापूंच्या ‘डॉक्टर कन्या’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. डॉ. सुशीला नय्यर यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ रोजी गुजरात (पंजाब) जिल्ह्यातील ‘कंजा’ गावात झाला. हे गाव पाकिस्तानात आहे. शुक्रवारी (दि़२६) त्यांच्या जन्माला १०० वर्षे पूर्ण होत आहे़ त्या शीख परिवारातील असून धार्मिक, सनातनी वातावरणात छत्र हरविले. यामुळे मोठे भाऊ प्यारेलालजी पितृतुल्य व गुरू समान मानले. डॉ. सुशीला नैयर यांना लहानपणापासून ‘बहनजी’ म्हणत असे. पुढे आदराने त्यांना ‘बडी बहनजी’ म्हणू लागले, ते कायमचेच! सुट्ट्यांच्या कालावधीत प्रथमच त्या १९३० मध्ये साबरमती आश्रमात प्यारेलालजी सोबत गेल्या. दुसऱ्या वर्षीही त्यांना जाण्याचा योग आला; पण बापूंची भेट होऊ शकली नाही. आश्रमातील सर्व काम त्या मन लावून करू लागल्या. पेळू बनविणे, सूत कातने आदी कामात त्या तरबेज झाल्या. १९३६ मध्ये गांधीजी सेवाग्राम येथे आले. आश्रम स्थापन झाला. ग्रामोन्नोतीचे कार्य आणि स्वातंत्र्य चळवळीला प्रारंभ झाला़ दरम्यान, बहनजी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून त्या आश्रमात आल्या. या मागे त्यांचे भाऊ प्यारेलालजी यांची प्रेरणा होती. प्रारंभी आश्रमातील कार्यकर्त्यांच्या आरोग्याची जबाबदारी गांधीजींकडे होती. ते प्राकृतिक चिकित्सा पद्धतीवर उपचार करीत. बहनजी आश्रमात आल्यानंतर ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. स्वतंत्र व्यवस्था म्हणून जमनालाल बजाज यांचे निवासस्थान (आखरी निवास) देण्यात आले. याच ठिकाणी एक छोटेखानी दवाखाना सुरू केला. याच छोटेखानी दवाखान्याचे मोठे स्वरूप कस्तुरबा दवाखान्याने घेतले. हा दवाखाना गांधीजींच्या इच्छेनुसार बिडलाजींच्या गेस्ट हाऊस येथे १९४५ मध्ये करण्यात आला.