शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
3
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
4
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
5
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
6
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
7
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
8
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
9
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
10
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
11
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
12
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
13
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
14
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
15
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
16
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
17
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
18
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
19
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
20
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?

‘बापूजींचे सुवर्ण स्वप्न साकार करुया’

By admin | Updated: April 12, 2016 04:28 IST

बापूजींचे सुवर्ण स्वप्न साकार करूया, या मराठीतील बोलाने आणि जगातील इतरही भाषांमध्ये आपल्या अमोघ वाणीने

वर्धा : बापूजींचे सुवर्ण स्वप्न साकार करूया, या मराठीतील बोलाने आणि जगातील इतरही भाषांमध्ये आपल्या अमोघ वाणीने महात्मा गांधीजींच्या विचारांवर चालू या, असा संदेश कीर्तीचे गांधीवादी, तीनदा गिनीज बुक आॅफ वर्ल्ड प्राप्त कलारत्न, तेलगू गझलचे अग्रदूत डॉ. केसरराजू ऊर्फ गझल श्रीनिवास यांनी दिला.कस्तुरबा गांधी व महात्मा ज्योतीराव फुले जयंतीच्या पूर्वसंध्येला विश्वव्रिकम केलेले गझल गायक डॉ. श्रीनिवास यांनी ‘आज की शाम महात्माओं के नाम’ या गझल संध्यातून महात्म्यांना अभिवादन केले. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानद्वारे आश्रमाच्या नई तालिम परिसरात हा कार्यक्रम पार पडला. महात्मा गांधी संपूर्ण जगाचे नायक असून त्यांच्या मार्गावर जगाने चालणे, त्यांचे विचार अंगिकारणे, हा प्रत्येकाच्या जीवन जगण्याचा मंत्र असायला हवा, असे गौरवोद्गारही डॉ. गझल श्रीनिवास यांनी महात्मा गांधीवरील भजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी काढले. जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, सचिव श्रीराम जाधव, डॉ. शिवचरण ठाकूर, प्रसाद, सुषमा शर्मा, शत्रूघ्न मून आदी उपस्थित होते.डॉ. श्रीनिवास यांनी ग्रामस्वराज्य, गांधीजींचे संपूर्ण जीवन आणि संदेश त्यांच्या लोकप्रिय गीतातून दिला. ‘हर तरफ प्यार सा मोहब्बतसी है... यह जगह लग रही जन्नत सी है...’ आणि ‘इद चाँद खो गया है कोई... जाने किस देश जा बसा है कोई...’ या गझलांसह ‘कोई ताजाद ख्याल दे मौला...दिल से गफलत निकाल दे मौला’ ही सुफी गझल गाऊन उपस्थितांची दाद मिळविली. डॉ. श्रीनिवास यांची मुलगी संस्कृती हिनेही उत्कृष्ट गायन सादर केले. नवीन, युगंधर, मंदाल इन सच्चा यांनी साथसंगत केली.जिल्हाधिकारी सलील यांनी म. गांधीजींच्या पुतळ्यास सूतमाला अर्पण करून दीपप्रज्वलन केले. प्रत्येक महिन्यात आश्रमात सांस्कृतिक, वैचारिक कार्यक्रम होत राहावे, यासाठी प्रशासन सोबत राहील. मी ही आश्रमाचा एक सदस्य असून हे माझे दुसरे घरच आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. प्रास्ताविक जयवंत मठकर यांनी केले. संचालन प्रसाद यांनी केले तर आभार श्रीराम जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला संजय इंगळे तिगावकर, बी.एस. मिरगे, प्रफुल्ल दाते, विनेश काकडे, किशोर वानखेडेसह विदेशी पर्यटक, नागरिक हजर होते.(कार्यालय प्रतिनिधी)गीतांतून उलगडला हैदराबाद, सेवाग्रात ते पोरबंदर प्रवास४घर घर जलायेंगे शांती की ज्योती, डगडग बसायेंगे खुशीओंकी बस्ती, दिलोंसे दिलोतक बनाने है रिश्ते, हमे धडकनो से निभाने है रिश्ते, गांधीजीने सबको शांती, अहिंसा, सच्चाई की राह पर चलना सिखलाया है, आदी गितांसह हैदराबादपासून सेवाग्राम ते पोरबंदरचा प्रवास उलगडला. ४महात्मा गांधीजींचा जीवन संदेश संगीताच्या माध्यमातून जगभर पोहोचविण्याचा ध्यास घेतला असल्याची भावना डॉ. गझल श्रीनिवास यांनी गीतांद्वारे व्यक्त केल्यात.