शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हिवताप जनजागृती रॅलीचा बापू कुटीत समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 23:31 IST

देशभरात २५ एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केल्या जातो. याच दिवसाचे औचित्य साधून हिवताप जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचा समारोप सेवाग्राम येथील बापू कुटीत झाला.

ठळक मुद्देतज्ज्ञांनी केले मार्गदर्शन : चित्ररथाद्वारे चौकाचौकात दिली कीटकजन्य आजाराची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशभरात २५ एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केल्या जातो. याच दिवसाचे औचित्य साधून हिवताप जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचा समारोप सेवाग्राम येथील बापू कुटीत झाला. सदर रॅलीत सहभागी चित्ररथाच्यामाध्यमातून ठिकठिकाणी तज्ज्ञ मंडळींनी कीटकजन्य आजार विषयावर मार्गदर्शन केले. हा उपक्रम आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्यात आला.जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारायकर, जिल्हा प्रशिक्षण पथकचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवतकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. धाकटे, साथरोग तंत्रज्ञ डॉ. झलके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर रॅलीची सुरूवात झाली. या सायकल रॅलीमध्ये आरोग्य विभागाचा चित्ररथ सहभागी होता. सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणाऱ्या याच चित्ररथाच्या माध्यमातून नागरिकांना तज्ज्ञ मंडळींनी किटकजन्य आजाराची माहिती व उपाययोजनांची माहिती साप्या शब्दात दिली. सदर सायकल रॅलीचे शहरातील बजाज चौक, इंगोले चौक, डॉ. रायजादा क्लिनिक मार्गे पोस्ट आॅफीस चौक ते सेवाग्राम येथील बापू कूटी गाठली. यावेळी समारोपीय कार्यक्रम पार पडला. या रॅलीच्या माध्यमातून हिवताप, हत्तीरोग आदी विषयांवर जनजागृती करण्यात आली. रॅलीत आरोग्य विभाग व हिवताप, हत्तीरोग, क्षयरोग, प्रशिक्षण पथक आदी विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. सेवाग्राम येथील नई तालीम येथील शांतीभवनात पार पडलेल्या समारोपीय कार्यक्रमाला कस्तुरबा हेल्थ सोसायटी सेवाग्रामचे सचिव डॉ. बी.एस गर्ग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, नई तालीम सेवाग्रामचे सचिव डॉ. शिवचरणसिंग ठाकूर, डॉ. रेवतकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस सुतमाला अर्पण करून त्यांना अभिवादन केले. व्यासपीठावरील उपस्थितांचे स्वागत ग्रामगिता देवून करण्यात आले. डॉ. अजय डवले यांनी जिल्ह्यात हिवतापाची स्थिती सर्व्हेक्षण प्रतिबंधात्मक उपाययोजने विषयी मार्गदर्शन करताना सांगितले. डॉ. ठाकूर यांनी मनोगत व्यक्त करताना हिवतापाच्या वर्तमान परिस्थितीबाबत समाधान व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. गर्ग यांनी हिवताप उपचार, केंद्र शासनाची हिवताप विषयक भूमिका विषद केली. तसेच आशा सेविका यांच्या कार्याची दखल घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रवीण धाकटे यांनी केले. तर संचालन अरविंद लोखंडे यांनी केले. कार्यक्रमाला नई तालीम या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, कासाबाई नर्सिग स्कूलच्या विद्यार्थिनी यांच्यासह काळसर्पे, पाटील, नंदनवार, मानकर, बोटकुले, ढगे, गावंडे, कुमरे, जाधव, तायवाडे, चंद्रे, पोथारे, भोयर आदींची उपस्थिती होती. सदर जनजागृतीपर सायकल रॅलीच्या माध्यमातून हिवताप म्हणजे काय याची माहिती नागरिकांना देण्यात आली.