शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बापू कुटीला शिंदुल्यांच्या फांद्यांचा आधार

By admin | Updated: June 23, 2014 00:14 IST

पावसाळ्याच्या दिवसात मातीच्या असलेल्या बापू कुटीवर विपरित परिणाम होतो. या पावसाच्या पाण्यापासून बचावाकरिता आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने पावसाळ्यात शिंदुल्यांच्या फांद्या

पावसापासून संरक्षण : पूर्वीपासून हीच पद्धत अस्तित्वातसेवाग्राम : पावसाळ्याच्या दिवसात मातीच्या असलेल्या बापू कुटीवर विपरित परिणाम होतो. या पावसाच्या पाण्यापासून बचावाकरिता आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने पावसाळ्यात शिंदुल्यांच्या फांद्या रक्षणाकरिता लावण्यात येतात. ही पद्धत आजही कायम असल्याने बापूकुटीला शिंदुल्यांच्या फाद्यांचा आधार असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आजचे सेवाग्राम पूर्वीचे शेगाव आडवळणाचे आणि खेडे गाव. महात्मा गांधी वर्धेला आले असता ग्रामीण लोकांची सेवा आणि कार्य करण्याच्या हेतूने ते येथे राहायला आले. १९३६ मध्ये महात्मा गांधी गावात वास्तव्यास आले. यावेळी गावकऱ्यांनी बापूंच्या कार्यास सहकार्य दर्शविले. शेगावात राहण्याचा निर्णय झाल्यानंतर आदी निवास, बापू कुटी, कार्यालय, आखरी निवासाची निर्मिती करण्यात आली.बापूंच्या तत्वानुसार झोपड्या बनविण्यात आल्याने कुड, माती, बांबू, बल्ली, बोऱ्या व कवेलू या स्थानिक साहित्याचा वापर करण्यात आला. या गावामध्ये शिंदूल्यांच्या झाडांचे वन होते. रस्त्याच्या दुतर्फा ते आजही दिसून येते. याचा उपयोग विविधांगी होतो. आश्रमात बसण्यासाठी आणि झोपण्यासाठी याच्या चटया बनविल्या जात होत्या. परिसरातील सर्वच वास्तू कुटी मातीच्या व कुडाच्या असल्याने पावसाळ्यात धोका निर्माण होत होता. तेव्हा भिंतीचे संरक्षण करण्यासाठी पानोळ्यांच्या (फांदी) फांद्या लावल्या जात होत्या. बापू कुटीमध्ये भिंतीवर या झाडाचे चित्रही दिसून येते. आजही पावसाळा सुरू झाला की भिंतीच्या संरक्षणासाठी फांद्या लावण्यात येतात. त्या कामात सध्या कामगार व्यस्त असल्याने दिसून येत आहे. पावसाचे दिवस संपतातच ही पाने पुन्हा काढण्यात येणार असल्याचे आश्रम प्रतिष्ठानने सांगितले आहे.(वार्ताहर)