शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

बापू कुटीला भेट देत स्वीकारला पदभार

By admin | Updated: May 31, 2015 01:41 IST

महात्मा गांधी यांच्या कर्मभूमीत काम करण्याची संधी मिळत असल्याचा आनंद असून वर्धा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांचे सहकार्य घेण्यात येईल.

नवीन सोना यांना निरोप : नवीन जिल्हाधिकारी रूजू वर्धा : महात्मा गांधी यांच्या कर्मभूमीत काम करण्याची संधी मिळत असल्याचा आनंद असून वर्धा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांचे सहकार्य घेण्यात येईल. जिल्ह्याच्या विकासासाठी एक टीम म्हणून काम करण्याचा मनोदय नवनियुक्त जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी व्यक्त केला. वर्ध्याचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी शनिवारी जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांच्याकडून पदभार स्वीकारला. जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी सेवाग्राम येथे महात्मा गांधी यांच्या आश्रमामध्ये भेट देत बापू कुटीत प्रार्थनाही केली. नवीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी अमरावती येथे प्रारंभी प्रोबेशन सेवा काळ पूर्ण झाल्यानंतर चंद्रपूर येथे उपविभागीय महसूल अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून कार्य केले आहे. त्यांच्या काळात ग्रामविकासाच्या विविध योजना राबविल्या. जिल्ह्याच्या विकासाकरिता गरजेचे असलेले निर्णय तत्परतेने घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून भरीव कामाची अपेक्षा वर्धेकर करीत आहेत.नवीन सोना यांना निरोपमावळते जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांना निरोप तसेच नवनियुक्त जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या स्वागताचा कार्यक्रम विकास भवन येथे अपर जिल्हाधिकारी संजय भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झाला.जिल्ह्याच्या विकासासोबतच नवीन उपक्रम राबविताना जिल्ह्यातील जनतेचे तसेच अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य मिळाल्याचे सांगताना एन. नवीन सोना म्हणाले की वर्धा जिल्हा इ-जिल्हा करण्याचा यशस्वी प्रकल्प राबविल्याचे म्हणाले. देशात सर्वप्रथम जीआयएस प्रणालीवर आधारीत क्राईम मॅपिंग करण्यासोबतच मोबाईल पंचनामा करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण प्रकल्पाची सुरुवात केल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असलेले निर्णय तत्परतेने घेवून ते प्रभावीपणे राबविण्याला प्राधान्य देण्यात येईल असे सांगितले. जनतेला शासनातर्फे देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ व सेवा सहज व सुलभपणे करण्याला प्राधान्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, कर्मचारी संघटनेतर्फे शैलेंद्र देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन अतुल रासपायले यांनी केले. आभार उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील यांनी मानले. व्यासपीठावर उपवसंरक्षक मुकेश गाणात्रा, उपजिल्हाधिकारी वालस्कर, जैन, शिरीष पांडे, आर्वी उपविभागीय अधिकारी फडके उपस्थित होते.