शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नदीतच होतेय बाप्पाचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 22:26 IST

मूर्ती विसर्जनाने होणारे जल प्रदूषण टाळण्यासाठी ठिकठिकाणी कृत्रिम हौद तयार करून त्यात गणरायांचे विसर्जन करावे, अशा संबंधीतांच्या सूचना आहेत.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष : पवनारात यंदा विसर्जनासाठी हौद नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/पवनार : मूर्ती विसर्जनाने होणारे जल प्रदूषण टाळण्यासाठी ठिकठिकाणी कृत्रिम हौद तयार करून त्यात गणरायांचे विसर्जन करावे, अशा संबंधीतांच्या सूचना आहेत. परंतु, सध्या पवनार येथील धाम नदीपात्रात बाप्पाचे विसर्जन केले जात आहे. पवनारात विसर्जनासाठी हौद तयार करणे गरजेचे असताना त्याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची ओरड आहे. जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षीत कारभारामुळे पवनारची धाम नदी प्रदूषित होण्याची शक्यता बळावत आहे.नजीकचे पवनार हे गाव गेल्या काही वर्षांपासून आपली वेगळी ओळख जपत आहे. या गावातून जाणारी धाम नदी ही वर्धेकरांची तहाण भागवते. परंतु, याच नदीपात्रात गणेशोत्सवादरम्यान मातीच्या तसेच प्लास्टर आॅफ पॅरीसच्या गणेश मूर्ती विसर्जित केल्या जातात. अनेक भाविक निर्माल्य नदी पात्रातच विसर्जित करतात. यामुळे होणाºया जल प्रदूषणात वाढ होते. विसर्जन उत्सवादरम्यान जल प्रदूषणाला आळा घालता यावा, यासाठी शासकीय स्तरासह न्यायालयीन स्तरावरून काही मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. परंतु, त्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्षच केले जात आहे.वास्तविक पाहता पवनार येथे विसर्जन सोहळ्यादरम्यान जल प्रदूषण होऊ नये या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन तेथे कृत्रिम हौद तयार करणे क्रमप्राप्त होते. पण, याकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या थेट नदीपात्रातच बाप्पाचे विसर्जन होत आहे. परिणामी, पवनारात होणाºया जल प्रदूषणाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनासह तेथील ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.हिंगणघाटात वणा नदीच्या तिरावर गणरायाच्या विसर्जनासाठी हौदाची व्यवस्थाहिंगणघाट - गणेशोत्सव सध्या अंतिम टप्प्यात येत असून हजारो भाविक आपल्या लाडक्या गणराची मूर्ती नदी व जलाशयात विसर्जित करतात. त्यामुळे जल प्रदूषणात वाढ होत नदीही प्रदूषित होते. होणारे जल प्रदूषण व नदी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी यंदाही वणा नदीच्या तिरावर कृत्रिम हौदाची निर्मिती करण्यात आली आहे. नागरिकांना प्रबोधन करण्यासाठी व हौदात गणेश मुर्तीचे विसर्जन करून घेण्याकरिता तसेच निर्माल्य गोळा करण्यासाठी पर्यावरण संवर्धन संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहकार्य करणार आहेत. हौद तयार करण्याचे हे यंदाचे तिसरे वर्ष असून भाविकांनी यातच बाप्पाचे विसर्जन करावे, अशी विनंती आशिष भोयर, प्रा. अभिजित डाखोरे, प्रदिप गिरडे, रमेश झाडे, सतीश चौधरी यांच्यासह यांनी नगराध्यक्ष व न.पं. मुख्याधिकाºयांनी आणि पर्यावरण संवर्धन संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे. नुकतीच या हौदाची पाहणी वरिल मान्यवरांनी केली.नदी व जलाशये प्रदूषित होऊ नये म्हणून योग्य सूचना जिल्ह्यातील नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थाना देण्यात आल्या आहेत. पवनारची धाम प्रदूषित होऊ नये म्हणून मोठ्या विसर्जन कुंडाचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचे काम लवकरच सुरू होऊन सहा-सात महिन्यात कुंड तयार होईल.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी वर्धा.गणपती मूर्ती विसर्जन सोहळ्यामुळे गावात यात्रेचे स्वरूप येते. आठ ते दहा हजार मुर्तींचे विसर्जन धाम नदीत दरवर्षी होते. होणाºया नदी प्रदूषणाचे वास्तव जिल्हा प्रशासनाला सहज कळावे यासाठी दोन वर्ष आम्ही स्वत: नदी पात्र स्वच्छ केली. ग्रा.पं.ने पुढाकार घेऊन नुकतेच निर्माल्यकुंड तयार केले आहे. नागरिकांनी निर्माल्य नदीत न विसर्जित करता घरीच कुंडीत साठवून त्यापासून खत तयार करावे व ते झाडाला द्यावे. खºया अर्थाने नागरिकांची मानसिकता बदलल्यास प्रभावी कार्य होईल.- अजय गांडोळे, सरपंच, पवनार.