शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामातील पीककर्ज वाटपात बँकांनी गाठले अर्धशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 22:28 IST

ग्रामीण भागात १५ ते २० गावांचे व्यवहार लगतच्या मोठ्या गावातील बँकेवरच अवलंबून असतात. संचारबंदी आणि वाहतुकीची साधनेही या काळात उपलब्ध न झाल्याने कर्ज प्रकरणे दाखल करण्यातही खोडा निर्माण झाला होता. सेकंड अनलॉकनंतर कर्ज वाटप प्रक्रियेला गती आली आहे. शेतकऱ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत ४२४ कोटी ५१ लाखांचे कर्जवाटप झाले असून बँकांनी निम्मे उद्दिष्ट गाठले  आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावेळीही करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे खरीप हंगामातील पीककर्ज वितरण  प्रक्रिया मध्यंतरीच्या काळात मंदावली होती. अनलॉकनंतर कर्जवाटपाला गती आली असून ३१ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील ३६ हजार ५३४ शेतकऱ्यांना ४२४ कोटी ५१ लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. कर्जवाटपाची ही टक्केवारी ५० टक्के आहे.जिल्ह्यातील बँकांना  ८५० कोटी रुपये खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. जिल्ह्यात ४ लाख ३३ हजार ८५० हेक्टरवर खरिपातील पिकांची पेरणी करण्यात आली. खरीप हंगाम आता उलटण्याच्या मार्गावर असून १ ऑक्टोबरपासून रब्बी हंगामाकरिता पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागीलवर्षी तब्बल पाच महिने लॉकडाऊन होते. यावेळीही मार्च महिन्यापासून कोरोनाने कहर केला. एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्येने अक्षरश: तांडव घातले. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून कठोर निर्बंध घालण्यात आले होते. शासकीय कार्यालयात १५ टक्के उपस्थितीचा नियम लागू करण्यात आला होता. ८ मे पासून १८ मे पर्यंत कठोर निर्बंध लागू करण्यात आल्याने या काळात बँकांदेखील बंद होत्या. ग्रामीण भागात १५ ते २० गावांचे व्यवहार लगतच्या मोठ्या गावातील बँकेवरच अवलंबून असतात. संचारबंदी आणि वाहतुकीची साधनेही या काळात उपलब्ध न झाल्याने कर्ज प्रकरणे दाखल करण्यातही खोडा निर्माण झाला होता. सेकंड अनलॉकनंतर कर्ज वाटप प्रक्रियेला गती आली आहे. शेतकऱ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत ४२४ कोटी ५१ लाखांचे कर्जवाटप झाले असून बँकांनी निम्मे उद्दिष्ट गाठले  आहे. 

१ ऑक्टोबरपासून रब्बीचे कर्जवितरण- खरीप हंगामातील पीककर्ज वितरणाने अर्थशतक गाठले आहे.  खरीप हंगाम आता उलटण्याच्या मार्गावर आहे. १ ऑक्टोबरपासून रब्बी हंगामाकरिता कर्ज वितरणाची प्रक्रिया सुरू होणार असल्याने प्रकरणे दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील एकूण खातेदार शेतकरी ३६५३४

मागीलवर्षीपासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. यावेळीही हे संकट कायम असल्याने मध्यंतरी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कर्ज वितरणावर परिणाम झाला. अनलॉकनंतर बँकांचे कामकाज पूर्वपदावर आले असून कर्जवाटपालाही गती आली आहे. खरीप हंगामातील कर्जवाटपाचे निम्मे उद्दिष्ट गाठण्यात आले आहे.-वैभव लहाने, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक.

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbankबँक