शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास बँकांकडून केली जातेय टाळाटाळ

By admin | Updated: May 30, 2015 00:10 IST

शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठण करण्यास सारवाडी येथील स्टेट बँक आॅफ इंडिया टाळाटाळ करीत आहे.

कारंजा (घा.) : शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठण करण्यास सारवाडी येथील स्टेट बँक आॅफ इंडिया टाळाटाळ करीत आहे. गोड बोलून कर्ज व व्याजाची रक्कम भरण्यास सांगितले आणि पुन्हा कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. दोन वर्षे कर्ज देता येणार नसल्याचे पत्रच सदर बँकेने देत हेकेखोरीचा प्रत्यय दिला, असा आरोप शेतकरी करीत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.सततची नापिकी, कर्ज, ओला व कोरडा दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कशीबशी पीक कर्जाची रक्कम जुळवून शेतकरी जुने कर्ज भरून नवीन वाढीव रक्कम मिळणार, या आशेने बँकांकडे पाहत आहे; पण बँक व्यवस्थापक शेतकऱ्यांना निराश केली असल्याचे दितसे. शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश असताना शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्ज वसुली केली जात आहे. शिवाय ऐन पेरणीच्या वेळी बोळवण केली जात आहे.तालुक्यातील बोंदरठाणा येथील शेतकरी सत्यविजय बापुराव गाखरे यांनी भारतीय स्टेट बँक शाखा सारवाडी येथून पीक कर्ज घेतले होते. या कर्जापोटी त्यांनी २८ एप्रिल रोजी मुद्दल ८६ हजार ४० रुपये अदा केले. शिवाय १३ मार्च रोजी २१ हजार ५०५ रुपयांचा भरणा करून मागील थकबाकीही अदा केली. यानंतर चालू हंगामाकरिता पीक कर्जाची मागणी केली असता सदर बँक पीक कर्ज देण्यास नकार देत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘तुम्हाला दोन वर्षे पीक कर्ज मिळत नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडे जा की मुख्यमंत्र्याकडे, त्यांना घेऊन या तरी पीक कर्ज मिळणार नाही’, अशी दमदाटीही व्यवस्थापकाने केली. दुष्काळी परिस्थितीत कर्जमुक्तीसाठी जवळची रक्कम बँकेत भरल्याने व आता कर्ज नाकारल्याने शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे. हे एकच नव्हे तर तालुक्यात अनेक प्रकरणे आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष कारवाई करावी व कर्ज मिळवून द्यावे, अशी मागणी शेतकरी सत्यविजय गाखरे यांनी निवेदनातून केली आहे.(शहर प्रतिनिधी)बँक महाअदालतीत शेतकऱ्यांना चुकीची माहिती देऊन गोडी-गुलाबीने कर्जाची वसुली करून घेतात. पीक कर्ज वाटपाची वेळ आल्यावर ते नाकारले जाते. नापिकी, कर्जबाजारीपणाने शेतकरी त्रस्त आहे. यातच कर्ज भरूनही पीक कर्ज मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी कर्ज का भरावे, हा प्रश्नच आहे. बँकेने १२ मे रोजी कर्ज मिळणार नाही, असे पत्र दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.