शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

केळीच्या बागा पाण्याअभावी करपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 22:50 IST

तालुक्यातील केळीच्या बागा पाण्याअभावी करपल्या आहेत. विहिरींनी तळ गाठल्याने तर काही शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये थेंंब भरही पाणी नसल्याने तसेच जून महिन्याचे १५ दिवस लोटूनही दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढावली आहे. या प्रकारामुळे शेतकºयांच्या अडचणीत भर पडली असून त्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या अडचणीत भर : शासकीय मदतीची मागणी

प्रफुल्ल लुंगे ।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : तालुक्यातील केळीच्या बागा पाण्याअभावी करपल्या आहेत. विहिरींनी तळ गाठल्याने तर काही शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये थेंंब भरही पाणी नसल्याने तसेच जून महिन्याचे १५ दिवस लोटूनही दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढावली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असून त्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.सेलू तालुक्यातील नामशेष होवू पाहणाऱ्या केळीच्या बागांची संख्या पुन्हा वाढीला लागली होती. एवढेच नव्हे तर केळी पिकविण्याचे नवीन तंत्रज्ञान असलेले पाच युनिट सेलूत सुरू झाले. कच्ची केळी या राईपनिंग युनिटमध्ये पिकवून विक्रीसाठी मोठ्या बाजारपेठेत पाठविल्या जाते. आतापर्यंत ठिंबक सिंचनावर जागविलेल्या बागा उन्हाने करपल्या आहेत.विहिरी कोरड्या पडल्या आहे. उभे पीक वाळताना पाहुन शेतकरी हवालदील झाला आहे. हिच परिस्थिती ऊस उत्पादक शेतकºयांवरही ओढावली आहे. एकूणच यंदाच्या दुष्काळाने अनेकांच्या अडचणीत भर टाकली असून नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाने भरीव शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.यंदा पाण्याची भीषण टंचाई आहे. जून महिन्याचे १५ दिवस लोटले तरी दमदार पाऊस झाला नाही. करपलेली काही झाडे दमदार पाऊस आल्यावर हिरवी होण्याची शक्यता असल्याने पावसाची प्रतीक्षा आहे. शेतातील विहिरीही कोरड्या झाल्याने केळीच्या बागा करपल्या आहेत. केळीचा बगीचा तयार करायचा खूप खर्च येतो. त्यामुळे शासनानेही नुकसानग्रस्त शेतकºयांना दिलासा देण्यासाठी भरीव शासकीय मदत द्यावी.- पुरूषोत्तम बोबडे, केळी उत्पादक शेतकरी, वडगाव (कला.).