शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रसायनाने केळी पिकविणाऱ्याला कारावास

By admin | Updated: August 11, 2016 00:32 IST

रसायनाचा वापर करून केळी पिकविल्याप्रकरणी एका फळ विक्रेत्यावर अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा १९५४ अंतर्गत २०१० मध्ये कारवाई करण्यात आली होती.

एक हजार रुपयांचा दंड : मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा निर्वाळा वर्धा : रसायनाचा वापर करून केळी पिकविल्याप्रकरणी एका फळ विक्रेत्यावर अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा १९५४ अंतर्गत २०१० मध्ये कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात मुख्य न्यायदंडाधिकारी एस.एन. माने यांनी आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड तथा दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाची अतिरिक्त शिक्षा सुनावली. हा निर्वाळा सोमवारी देण्यात आला. अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत इथेपॉन या रसायनाचा केळी पिकविण्याकरिता बंदी असताना वापर करण्यात आल्याचे आढळून आले होते. याबाबत अन्न व औषध प्रशासन वर्धाचे तत्कालीन अन्न निरीक्षक ल.प्र. सोयाम यांना मिळाली होती. यावरून मे. काझी जियाउद्दीन सलाउद्दीन फु्रट मर्चंट व कमिशन एजंट इतवारा यांच्या पेढीस भेट दिली. सदर पेढीचा व्यवहार काझी जियाउद्दीन सलाउद्दीन पाहत असल्याचे आढळले. अन्न निरीक्षकाने तपासणी केली असता प्रतिबंधीत इथेपॉन रसायनाच्या द्रावणात कच्ची केळी बुडवून त्याचा वेगळा ढीग लावण्यात येत होता. याप्रकारे केळी पिकविण्याची प्रक्रिया होत असल्याचे आढळले. ही बाब लक्षात आल्याने तपासणी अहवाल व पंचनाम्यात नमूद करण्यात आली. केळी व इथेपॉन रसायनाचा नमूना विश्लेषणाकरिता घेण्यात आला. यात इथेपॉन रसायानाचा वापर केल्याचे निष्पन्न झाले होते. केळी पिकविण्याकरिता वापरलेले रसायन इथेपॉन असल्याचेही निष्पन्न झाले. संपूर्ण तपासांती आरोपीविरूद्ध मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात २०१० मध्ये दोन प्रकरणे दाखल करण्यात आली. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर केळी पिकविण्यासाठी इथेपॉन या रसायनाचा वापर केल्याचे सिद्ध झाले. यावरून विद्यमान मुख्य न्यायदंडाधिकारी एस.एन. माने यांनी आरोपी दोन्ही खटल्यात एक वर्ष सश्रम कारावास, एक हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची अतिरिक्त शिक्षा सुनावली. शासनातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता एस.डी. थूल यांनी युक्तीवाद केला. यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे, एस.पी. नंदनवार यांनी प्रयत्न केले.(कार्यालय प्रतिनिधी)