शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टर आॅफ पॅरीसच्या गणेश मूर्तीवर बंदी

By admin | Updated: July 29, 2016 02:02 IST

जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या हद्दीत गणेश उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : कुंभार संघटनेची माहिती वर्धा : जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या हद्दीत गणेश उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती विक्रीकरिता येत असतात. यामुळे प्रदूषण होत असल्याने या मूर्तीच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती कुंभार कारागिर एकता संघटनेने दिली. वर्धा, देवळी, पुलगाव, हिंगणघाट, आर्वी या नगर परिषद व समुद्रपूर, सेलू, आष्टी, कारंजा या नगर पंचायतीच्या हद्दीमध्ये गणेश उत्सवाच्या दरम्यान प्लॉस्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती बनविणे व विकणे प्रतिबंधीत करावे या मागणीचे निवेदन प्रा. भास्कर इथापे यांच्यासह कुंभार कारागीर एकता संघटनेचे अध्यक्ष अरूण वालदे, सचिव विनोद बोरसरे, सुरेश बोरसरे, सुभाष खांदारे, राकेश चौधरी, संजय खंदारे, प्रभाकर ठाकरे, श्रावण कपाट, शेषराव खांदारे, अजय कपाटे, अशोक कपाट, विजय कपाट, रवी कपाट, उमेश प्रजापती, चंदन प्रजापती, राजकुमार प्रजापती, योगेश प्रजापती यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी एका पत्राद्वारे जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगर पंचायती हद्दीत प्लॉस्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती बनविणे व विक्री करण्याबाबत बंदी आदेश दिला अहे. याबाबत औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठाने सार्वजनिक, हिताचे महाराष्ट्र शासन व इतर विभागांना प्रतिबंध आणि प्रदुषण नियंत्रण अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता निर्देश दिलेले आहे. त्या निर्देशाचे अवलोकन करून प्लॉस्टर आॅफ पॅरीसच्या मूर्त्यांवर प्रतिबंध लावण्याची कारवाई करण्याचे पत्र नगरपालिका व नगरपंचायत प्रशासनाने करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत. या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास संघटना नगरपालिका व नगर पंचायतीविरूद्ध न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला दाखल करणार असल्याचे पत्रकाद्वारे कळविले आहे.(प्रतिनिधी)