शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

कृषी व्यावसायिकांचा कडकडीत बंद

By admin | Updated: February 10, 2016 02:44 IST

शेतकऱ्यांना बियाणे, खते व औषधी विकण्यासाठी केंद्र शासनाने विविध प्रकारच्या अटी घालून कृषी सेवा केंद्र चालविण्यास

तालुकास्तरावर निदर्शने : शासनाच्या नव्या अटींना विरोधवर्धा : शेतकऱ्यांना बियाणे, खते व औषधी विकण्यासाठी केंद्र शासनाने विविध प्रकारच्या अटी घालून कृषी सेवा केंद्र चालविण्यास अडथळा निर्माण केल्याचा आरोप करीत जिल्हा कृषी व्यवसायी संघाच्यावतीने मंगळवारी आंदोलन पुकारण्यात आले. वर्धेत संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन सादर करण्यात आले. या निर्णयाचा सर्व कृषी व्यवसायिकांनी प्रतिष्ठाणे बंद ठेवत निषेध नोंदविला. केंद्र शासनाने नव्या नियमावलीप्रमाणे पदवीधारक असणे बंधनकारक केले असून त्यांना १५ हजार वेतन देण्याची अट घातली आहे. ग्रामीण भागातील कृषी सेवा केंद्राची महिन्याची कमाई १५-२० हजारांच्या घरात आहे. अशा स्थितीत एवढे वेतन देणे शक्य नाही. अनेक कृषीसेवा केंद्रचालक चवथी ते पदवीपर्यंत शिकले; पण प्रत्येकाने कृषी पदवी घेतली नाही. या वयात पदवीसाठी प्रवेश घेणे शक्य नाही. लहान गावांत अनेक छोटे दुकानदार आहेत. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे केंद्र शासनाने सर्व कृषी सेवा केंद्र चालकांसाठी कृषी पदवीऐवजी २ ते ३ महिन्यांचे एखादे प्रशिक्षण देऊन त्याचा दर्जा पदवीच्या समकक्ष पद्धतीने करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. वर्धेत जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन देताना संघाचे अध्यक्ष रवी शेंडे यांच्यासह आकाश शेंडे, चंद्रकांत ठक्कर, विपीन मिराणी, दिनेश जाधव तसेच वर्धा तालुक्यातील कृषी व्यवसायी उपस्थित होते. आष्टीत व्यावसायिकांनी त्यांची दुकाने बंद ठेवत अटी शिथील करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदारांना सादर केले. बंदमुळे शेतकऱ्यांना आज बियाणे वा साहित्य मिळाले नाही.याप्रकरणी तहसीलदार सीमा गजभिये यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मागण्या केंद्र शासनापर्यंत पोहोचविण्यासची विनंती करण्यात आली. याप्रसंगी तालुका कृषी व्यावसायी संघाचे सोनू भार्गव, दिलीप राठी, राजेंद्र मदनकर, प्रभाकर कडू, दिनेश बुले, सागर साबळे, गोवर्धन वरठी, विनोद वांगेकर, गोपाल टावरी, डॉ. नारायण खेरडे, पद्माकर पाठे यांच्यासह सर्व कृषी सेवा केंद्रचालक उपस्थित होते. यानंतर झालेल्या सभेत त्वरित निर्णय न घेतल्यास कृषी सेवा केंद्रचालक मोठा संप पुकारतील, अशी माहिती सोनू भार्गव यांनी दिली. बंदमुळे संत्रा उत्पादक तसेच भुईमूंग पेरणी करणारे शेतकरी बियाणे, खेते, औषधासाठी फिरत होते. समुद्रपूर येथे निर्णयाविरूद्ध निदर्शने करण्यात आली. शासनाने हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली. याकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तिव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी सुगनचंद्र सिसोदिया, महादेव बादले, पांडुरंग बाभुळकर, धनंजय शेंडे, दीवाकर गाठे, सचिन दोंदल, प्रफूल अग्रवाल, श्रीकांत महाबुधे, खुशाब लोहकरे, डॉ. ज्ञानेश्वर वासनिक, विनोद बाभुळकर, दिलीप जोशी, परमेश्वर व्यापारी, संजय लोणकर, सारंग गुळघाणे, सुरेश शंभरकर, अंकूश महाकाळकर, रमेश मोटघरे, जगदीश वाटकर, वासुदेव गौळकार, भुहरी मुडे, योगेश महाजन, संजय ढोकपांडे, इश्वर सुपारे आदी उपस्थित होते.(लोकमत न्यूज नेटवर्क)