शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गिट्टी खदानीतील खड्ड्यांनी घेतला तिघींचा बळी

By admin | Updated: July 25, 2016 01:50 IST

गिट्टी खदानीत उत्खननामुळे निर्माण झालेल्या खड्डेरूपी तलावातील पाणी नागरिकांच्या जीवावर उठत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

वर्धा : गिट्टी खदानीत उत्खननामुळे निर्माण झालेल्या खड्डेरूपी तलावातील पाणी नागरिकांच्या जीवावर उठत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. देवळी तालुक्यातील आगरगाव येथील तीन मुलींचा या खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघड झाली. यावेळी एका गावकऱ्याच्या प्रयत्नाने त्यांच्यासोबत असलेल्या तिघी थोडक्यात बचावल्या. आगरगाव येथील सहा मुली या खदानीवर कपडे धुण्याकरिता गेल्या होत्या. यात खड्ड्यांतील पाण्यात पडून अंजली हिरणसिंग भोसले (१८), रोहिणी सुइंद्रसिंग चव्हाण (१६) व तोरणा नज्जुराव चव्हाण (१४) या तिघींचा मृत्यू झाला, तर दिक्षा प्रदीप पवार, वैशाली बंडुसिंग पवार व आशिकला नगीनराम पवार या तिघी थोडक्यात बचावल्या. या सहा जणी नित्याप्रमाणे गावालगत असलेल्या गिट्टी खदानीत उत्खननामुळे तयार झालेल्या तलावात साचलेल्या पाण्यात कपडे धुण्याकरिता गेल्या होत्या. कपडे धुताना रोहिणीचा पाय घसरून ती पडली. तिला वाचविण्यासाठी तोरणा आणि अंजलीसह इतर तिघीही पाण्यात उतरल्या; मात्र त्यांनीही गटांगळ्या घेतल्या. यावेळी रस्त्याने जात असलेल्या राजू सदाशिव मेंढेकार रा. आगरगाव याची या मुलींवर नजर पडली. त्याला त्या गटांगळ्या खात असल्याचे दिसताच त्याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. सहापैकी तिघींना वाचविण्यात त्याला यश आले; मात्र तिघींचा यात बळी गेला. गिट्टी खदानीत तयार होत असलेल्या या जीवघेण्या तलावांकरिता खदानीचे मालकच जबाबदार असल्याचे मत अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आले. गिट्टीचा उपसा झाल्यानंतर येथे तयार झालेले खड्डे बुजविण्याची जबाबदारी मालकांची आहे; मात्र त्यांच्याकडून असे होत नाही. यामुळे असे मृत्यूचे सापळे एका देवळी तालुक्यातच नव्हे तर अख्ख्या जिल्ह्यात निर्माण होत आहेत. वर्धेलगत बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे), येळाकेळी येथील अशा तलावांत अनेकांचा बळी गेला आहे. याची शासन दरबारी नोंद असली तरी त्यांच्याकडून या खदान मालकांवर काहीच कार्यवाही होत नाही, याचेच नवल! मृत्यू झालेल्या तिघी येथे नित्यानेच येत होत्या. पावसाचे दिवस असल्याने या खड्ड्यांतील पाण्याचा अंदाज चुकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा गावात आहे. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. शिवाय तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांनी गावाला भेट देत प्राथमिक अहवाल वरिष्ठांना पाठविल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी)