शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रामाणिकतेमुळे मिळाला बैलजोडीचा मालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 23:50 IST

सोशल मिडियाचा उपयोग जेवढा विघातक तेवढाच चांगला आणि महत्त्वाचा असल्याची अनेक उदाहरणे आहेत. असाच प्रत्यय खापरी गावात आला. सिमेलगतच्या गावातील बैलजोडी समुद्रपूर तालुक्यातील खापरी गावात भटकत आली.

ठळक मुद्देपारडीचे बैल आले होते खापरीत : शेतकऱ्याने सोशल मीडियावर टाकले फोटो

लोकमत न्यूज नेटवर्ककोरा : सोशल मिडियाचा उपयोग जेवढा विघातक तेवढाच चांगला आणि महत्त्वाचा असल्याची अनेक उदाहरणे आहेत. असाच प्रत्यय खापरी गावात आला. सिमेलगतच्या गावातील बैलजोडी समुद्रपूर तालुक्यातील खापरी गावात भटकत आली. सोशल मिडीयामुळे तब्बल चार दिवसांनी सोमवारी मालकाला सदर बैलजोडी प्राप्त झाली.चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्याच्या पारडी गावातील शेतकरी जुनघरे यांच्या मालकीची बैलजोडी समुद्रपूर तालुक्यातील खापरी गावात शुक्रवारी १० मे रोजी सायंकाळी ७ वाजता आली. येथील शेतकरी संदीप देशमुख यांच्या शेतातील वैरण खाऊ लागली. संदीप यांनी या बैलजोडीला हुसकावण्याचा प्रयत्न केला; पण दोन वेहा हे बैल त्यांच्या गोठ्यावर आले. सदर बैलजोडी अनोळखी असल्याचे संदीप यांच्या लक्षात आले. त्यांनी या बैलांना पाणी पाजून स्वत:च्या गुरांसोबत बांधून वैरण टाकले. सदर बैलांची माहिती बैलजोडी मालकाला मिळावी म्हणून देशमुख यांनी व्हॉट्स अ‍ॅपवर बैलाचा फोटो आणि माहिती टाकली. चार दिवसांपासून ही माहिती वेगवेगळ्या शेतकरी ग्रुपवर फिरत होती. दरम्यान, कोरा येथील रामदास इसनकर यांनी पारडी गावात दूरध्वनीवरून माहिती दिली.यावेळी बैलजोडी मालक जुनघरे यांना सोशल मिडीयावरील माहिती दिली. सदर शेतकऱ्याने सांगितलेल्या वर्णनावरून बैलजोडी त्यांची असल्याची खात्री झाली. जुनघरे यांनी बैलजोडी चरायला मोकळी रानात सोडली होती. दररोज ती दिवसभर शिवारातून सायंकाळी घरी परत येत होती; पण १० मे पासून बैलजोडी घरी परतली नव्हती. बैलजोडीचा शोध सुरू होता, सांगितले.आपली बैलजोडी समुद्रपूर तालुक्यातील खापरी गावात पोहोचल्याचे कळताच शेतकरी जुनघरे यांनी खापरी गाव गाठले. संदीप देशमुख यांची भेट घेतली. त्यांनी बैलांची ओळख विचारून वर्णनानुसार ओळख पटल्याने जोडी मालकाला बैलजोडी परत केली. शेतकरी संदीप देशमुख यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे खऱ्या मालकाला अखेर त्याची बैलजोडी प्राप्त झाली.मीडियाचा असाही उपयोगमोबाईल क्रांतीने सर्वांच्या हातात अ‍ॅन्ड्रॉईड फोन आले आहे. यामुळे सोशल मिडीयाचा वापर घरोघरी तथा ग्रामीण भागात होत असल्याचे दिसते. बैलजोडी त्यांच्या मालकाला प्रदान करण्यासाठी शेतकऱ्यानेही व्हॉटस् अ‍ॅपचा वापर केला.