शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाईट प्रवृत्तीचे दहन करणारी ‘मारबत’ ठरली लक्षवेधक

By admin | Updated: September 4, 2016 00:34 IST

पोळ्याचा करीचा दिवस म्हणजे तान्हा पोळा! या दिवशी दरवर्षी सकाळी गावातून मारबत काढण्याची परंपरा स्थानिक घुबडटोली परिसरात आजही जोपासली जात आहे.

घुबडटोली परिसरातील परंपरा कायम : गावाच्या शिवेवर जाळल्या जातात मेढ्यापुलगाव : पोळ्याचा करीचा दिवस म्हणजे तान्हा पोळा! या दिवशी दरवर्षी सकाळी गावातून मारबत काढण्याची परंपरा स्थानिक घुबडटोली परिसरात आजही जोपासली जात आहे. पिवळ्या मारबतीसह गावातील मेढ्या गोळा करून गावाच्या शिवेवर जाळल्या जातात. गावातील रोगराई, माशा-कुशा, महागाई आदी वाईट बाबींचे दहन केले जाते. पर्यायाने मानवी हृदयात असणाऱ्या वाईट प्रवृत्तीचे दहन केले जाते. पोळ्याचे औचित्य साधून शुक्रवारी सकाळी घुबडटोली भागातून निघालेली पिवळी मारबत लक्षवेधक ठरली.एका ट्रालीवर डीजे, तालावर नाचणाऱ्या गौळणी, गावातील मेढ्या गाळा केलेल्या ट्राल्या, हजारो नागरिकांचा सहभाग आणि सर्वात शेवटी वाईट प्रवृत्तीचे प्रतिक असलेली पिवळी मारबत, असा भव्य ताफा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत असताना पुलगावकरांचे लक्ष वेधत होता. नागरिकांनी आपल्या परिसरातील मेढ्या एकत्र करून ठेवल्या व कार्यकर्ते त्या ट्रालीत जमा करीत होते. मागील अनेक वर्षांपासून घुबडटोली परिसरातील नगरसेवक सुनील ब्राह्मणकर, विलास गाधने, नंदू काळसर्पे, विजय डुकरे, शेखर काळसर्पे यांच्यासह घुबडटोली परिसरातील मंडळी या परंपरेची शांततामय व धार्मिक सदभाव राखून जोपासना करीत आहे.(तालुका प्रतिनिधी)