शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

बंधाऱ्याच्या बॅक वॉटरमुळे शेतात शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:23 IST

सदर बंधारा हा वीस वर्षापूर्वीचा आहे. तेव्हा पासून या शेतकऱ्याचे वडील निव्वळ अज्ञानामुळे नुकसान सहन करीत होते. मुलाने शेती हाती घेतल्यानंतर सात-बारा वर असलेले क्षेत्र उपलब्ध क्षेत्रामध्ये खुप मोठी तफावर दिसून आली.

ठळक मुद्देनुकसानीचे सत्र २० वर्षांपासून सुरूच : अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : एम. आय. डी. सी. ला पाणीपुरवठा करण्यासाठी धाम नदीवर पवनारला बंधारा बांधलेला आहे. या बंधाऱ्याचे बॅक वाटरमुळे निंबाळकर या शेतकºयाच्या दोन एकर क्षेत्राला तळ्याचे स्वरूप आले आहे. शेतात पाणीच पाणी असल्याने उभ्या पिकांवर त्याचा परिणाम होत आहे.सदर बंधारा हा वीस वर्षापूर्वीचा आहे. तेव्हा पासून या शेतकऱ्याचे वडील निव्वळ अज्ञानामुळे नुकसान सहन करीत होते. मुलाने शेती हाती घेतल्यानंतर सात-बारा वर असलेले क्षेत्र उपलब्ध क्षेत्रामध्ये खुप मोठी तफावर दिसून आली. तेव्हा मोजणी केली असता जवळपास ३ एकर क्षेत्र कुठलाही मोबदला न देता आधीच घेतल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. या संदर्भात त्यांनी उपअभियंता म.औ.वि.म प्रादेशिक अधिकारी, म.औ.वि.म, नागपूर यांचेकडे वारंवार तक्रार दाखल केली. परंतु, विभागाने कुठलाही सर्व्हे केला नाही. शिवाय तक्रारीची साधी दखल घेतली नाही. त्या सोबतच उरलेल्या दोन एकर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बॅक वॉटरने नुकसान होत आहे. बंधाऱ्याचे दरवाजे वेळीच न उघडल्या जात असल्याने शेतकºयाचे नुकसान होत आहे. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीला विभागीय कार्यालयाकडे पाठविले आहे. सदर प्रश्न हा भूमिअभिलेखकडे येतो. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विभागीय कार्यालयामार्फत चौकशी करून निर्णय घेण्यात येईल. या प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी मात्र सांगता येणार नाही.- गोपाल सोनसरे, विभागीय व्यवस्थापक, एमआयडीसी, नागपूर.आमची ही वडिलापार्जीत शेती आहे. वडिलांच्या काळापासून येथे नेहमीच नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. नुकसान टळावे या उद्देशाने संबंधितांना तक्रार करण्यात आली. परंतु, त्यांच्याकडून उडवा-उडवीचे उत्तरे देऊन अडचणीत भर टाकली जात आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविण्यात आले आहे. परंतु, जिल्हाधिकारी योग्य न्याय करतील असा मला विश्वास आहे. कारण ते कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.- सुनील निंबाळकर, शेतकरी.

टॅग्स :agricultureशेती