शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात नोकरभरतीवर बंदी

By admin | Updated: October 11, 2014 23:12 IST

महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झाल्या. आचारसंहिता लागू झाली. निवडणुकीची लगबग सुरू असतानाच १९ सप्टेंबरला लोकसेवा आयोगाच्या सनदी अधिकाऱ्यांनी एससी, एसटी, ओबीसी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना,

वर्धा : महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झाल्या. आचारसंहिता लागू झाली. निवडणुकीची लगबग सुरू असतानाच १९ सप्टेंबरला लोकसेवा आयोगाच्या सनदी अधिकाऱ्यांनी एससी, एसटी, ओबीसी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना, त्यांनी मागासवर्गीय सवलतीचा लाभ घेतल्यास त्यांना लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या कोणत्याही शासनाच्या खुल्या प्रवर्गातील पदांवर नियुक्ती दिली जाणार नाही, असा घटनाबाह्य आदेश काढला आहे. आचारसंहितेच्या काळात काढलेला हा आदेश भारतीय राज्यघटनेला पूरक नसून तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे यांनी केली आहे.या संदर्भातील निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांच्यामार्फत राज्यपालांना देण्यात आले. त्यात भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३२० प्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला महाराष्ट्र शासनातील अधिकारी व इतर कर्मचारी यांच्या भरतीचे अधिकार आहेत. परंतु त्या भरतीचे नियम ठरविण्याचे अधिकार नाहीत. राज्याचा लोकसेवा आयोग राज्य शासनाला विविध सेवांमध्ये अधिकारी व कर्मचारी भरती करण्याचा घटनात्मक व कायदेशीर अधिकार आयोगाला नाही. केंद्र शासनाचा कार्मिक व प्रशिक्षण विभाग सेवाविषयक नियम आणि प्रक्रिया ठरवत असते. तसेच विविध शासकीय सेवांमध्ये भरतीसाठी आरक्षणाच्या अंमलबजावणीचे निर्देश देते. त्यांच्या निर्देशाच्या आधीन राहूनच राज्य लोकसेवा आयोगाला आपले काम करावे लागते. डीओपीटीने गुणवत्ताप्राप्त एससी, एसटी, ओबीसी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून शासनाच्या अधिकारी, कर्मचारी भरतीमधून नाकारण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला अशी घोषणा किंवा आदेश काढण्याचा अधिकारच नाही. विधिमंडळाच्या अधिकारात हा हस्तक्षेप करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे तो विधिमंडळाचा हक्कभंगसुद्धा ठरतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १९ सप्टेंबरला आदेश काढून एससी, एसटी, ओबीसी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गात भरतीसाठी बंदी घातली आहे. हा आदेश सर्व मागासवर्गीयांवर अन्याय करणारा असल्याचे महात्मा फुले समता परिषदेने म्हटले आहे. याबाबत काही महिन्यांपूर्वी याच आयोगाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झालेले सुधीर ठाकरे यांनी स्पष्टीकरनही दिले आहे. संबंधित सनदी अधिकाऱ्यांची चौकशीची मागणी परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, विनय डाहाके, सुधिर पांगुळ, अनिरूद्ध गवई, किशोर तितरे यांनी निवेदनाद्वारे केली.(शहर प्रतिनिधी)