शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

बाबासाहेबांचा बुद्धधम्म अंधश्रद्धामुक्त अन् विवेकनिष्ठ

By admin | Updated: April 17, 2016 02:03 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म स्वीकारताना या धर्मातील सर्व अंधश्रद्धा नाकारल्या, त्यांची शुद्धता करुन त्यांनी पुरोगामी, मानवीय बौद्ध धम्माचा स्वीकार केला.

श्याम मानव : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची व्याख्यानमालावर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म स्वीकारताना या धर्मातील सर्व अंधश्रद्धा नाकारल्या, त्यांची शुद्धता करुन त्यांनी पुरोगामी, मानवीय बौद्ध धम्माचा स्वीकार केला. त्यांना धम्माला रुजविण्याकरिता पुरेसा वेळ मिळाला नाही. पण त्यांच्या विचारांचा ग्रंथांचा अभ्यास केल्यास विक्तुबाबा व तत्सम बाबांकडे जाणे, गंडेदोरे, बांधणे, ग्रहताऱ्यांवर विश्वास करणे त्यांच्या विचारांच्या टोकाचे विपरीत आहे, हे लक्षात येईल, असे विचार अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने येथील पोलीस ग्राउंडवर चार दिवसीय व्याख्यानमालेच्या अखेरच्या दिवशीचे विचारपुष्प गुंफतांना मानव बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव, आयबीएन लोकमतचे सिनिअर प्रोड्युसर विनोद राऊत, भीम टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके, प्रसिद्ध गायक उत्कर्ष शिंदे, मुख्य आयोजक प्रमोद राऊत, अतुल दिवे, विशाल रामटेके, महेंद्र मुनेश्वर उपस्थित होते. मानव पुढे म्हणाले डॉ. आंबेडकरांनी तर्कशुद्ध पद्धतीने विविध धर्माची चिकित्सा केली. हिंदू धर्मातील अंधश्रद्धा, जातीभेद आणि अस्मृश्यतेची अमानवीय प्रथा त्यांना अमान्य होती. चिकित्सेअंतीच त्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. बुद्ध धम्मात अंधश्रद्धेला, बुवाबाजीला थारा नसणार, मानवता हेच सूत्र त्यांनी ध्यानात घेतले. आज आपण बाबासाहेबांचा धम्म विसरुन कुण्या बुवाबाबाच्या, मंत्रतंत्राच्या वा गंड्यादोऱ्यांच्या नादी लागत असू, तर आपण पुन्हा त्याच वाटेवर परत जात असल्याचे म्हणावे लागेल. सत्यनारायण नाकारला म्हणून परित्राण पाठ स्वीकारायचा काय? बाबासाहेबांचा विचार पुढे नेण्याकरिता पुरोगामित्व आणि सदसद्विवेकबुद्धी स्वीकारणे हीच आपली खरी गरज आहे, असेही ते निक्षून म्हणाले.महाराव म्हणाले डॉ. आंबेडकरांचे अनुयायांचा समाज हा जीवंत समाज आहे. रात्री उशिरापर्यंत पोट बाजूला ठेवून आपण बाबासाहेबांचे विचार ऐकत आहात, प्रबोधनाला पुढे नेत आहात, ही फार मोठी गोष्ट आहे. बाबासाहेबांचे विचार विस्तारण्याकरिता आपण स्वत:ला झोकून काम केले पाहिजे. प्रतिगामी शक्तीचा मुक्त संचार वाढला आहे, नको ते मुद्दे काढून देशभक्त, देशद्रोही ठरविले जात आहेत. मुळ मुद्दे-प्रश्न बाजुला सारुन धर्माचे आणि भावनिक आवाहन करुन नागरिकांची फसवणूक केली जात आहे. हा प्रतिगामी विचार थोपवून लावण्याकरिात आपल्याला सज्ज व्हावे लागेल, असेही महाराव म्हणाले. यावेळी दादासाहेब शेळके यांनीही प्रभावीपणे विचार व्यक्त केले. प्रास्ताविक प्रमोद राऊत यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन अतुल दिवे यांनी केले. या व्याख्यानाला हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.(जिल्हा प्रतिनिधी)