शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कारप्राप्ती यशाचे गमक नव्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:03 IST

आजपर्यंतच्या सेवाकाळात सपत्नीक सत्कार हा प्रथमच होत असल्याने वर्धेकरांच्या भरभरून प्रेमाचीच ही पावती आहे. हा सत्कार आम्ही दोघेही कधी विसरणार नाही असे उद्गार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काढले.

ठळक मुद्देशैलेश नवाल : सावरकर सेवा समितीतर्फे सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आजपर्यंतच्या सेवाकाळात सपत्नीक सत्कार हा प्रथमच होत असल्याने वर्धेकरांच्या भरभरून प्रेमाचीच ही पावती आहे. हा सत्कार आम्ही दोघेही कधी विसरणार नाही असे उद्गार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काढले.सावरकर सामाजिक सेवा समिती आणि सावरकर स्मारक नागरी समिती च्यावतीने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची महाराष्ट्र शासनकडून उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी स्मारक नागरी समितीचे अध्यक्ष हरीभाऊ वझुरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष अतुल तराळे, नवाल, सावरकर सेवा समितीचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र बोरकर उपस्थित होते.याप्रसंगी सक्षम संस्थेचे नरेंद्र नरोटे, भोजराज पाटील तसेच सावरकर भक्त मंडळाचे संजय ठाकरे, अजय गांडोळे, रवी सातदेवे यांनीही जिल्हाधिकारी यांचा सत्कार केला. याप्रसंगी संक्रांतीच्या पावन पर्वावर शैलेश नवाल यांच्या पत्नीचा ज्योती देशपांडे, माधवी व्यास आणि डॉ. स्मिता तराळे यांनी साडी, सौभाग्य साधने आणि ओटी भरुन सत्कार केला. सत्काराला उत्तर देतांना त्या म्हणाल्या समाजातील चांगल्या परंपरा ज्या संस्कार करणाऱ्या असतात त्याची जोपासना झालीच पाहिजे. जिल्हाधिकारी नवाल पुढे म्हणाले नगरातील थोर महात्म्याचे पुतळे आणि स्मारक ही नागरिकांना राष्ट्र आणि समाजसेवेची प्रेरणा देण्यासाठी उपयुक्त असतात. वर्तमान समाजात मुल्य घसरत चालली आहे. यशस्वी होण्याच्या परिभाषेत परिवर्तन झाले आहे. पुरस्कार प्राप्ती हे यशाचे गमक नव्हे.याप्रसंगी नगराध्यक्ष अतुल तराळे म्हणाले सावरकरांचे स्मारक हे माझे आहे. यात माझेही योगदान आहे. ही भावना जनमानसात रुजण्यासाठी प्रत्येकाने यशाशक्ती सहकार्य भावना ठेवावी. यथाशक्ती नगर परिषद सहकार्य करेलच पण हे स्मारक जनसामान्याच्या भावनाचे प्रतीक व्हावे ज्यातून अनेकांना प्रेरणा मिळू शकेल.स्मारक नागरी समितीचे अध्यक्ष हरीभाऊ वझुरकर म्हणाले स्मारकासाठी पुतळ्याचा भार मी उचलला असला तरी स्मारक निर्मितीनंतर त्याची देखभाल आणि सौंदर्यीकरण कायम राखण्यासाठी नागरिकांनी स्वयंपे्ररणेने पुढे आले पाहिजे. कार्यक्रमात सेवा समितीचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र बोरकर यांनी समितीच्या विविध उपक्रमाचे ध्येय पुर्तीचा उद्देश सांगून गत पाच वर्षापासून शहरात साजरी होत असलेली सावरकर जयंतीचाच परिणाम आज सावरकर स्मारक निर्मितीच्या वाटचालीत होत आहे. असे सांगितले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्याम देशपांडे यांनी केले तर आभार मदन परसोडकर यांनी मानले. कार्यक्रमाला माजी खासदार सुरेश वाघमारे, डॉ. प्रसाद देशमुख, रामदास ढोणे, अटल पांडे, अविनाश देव, सरपंच अजय गांडोळे, सुवर्णा काळे, अशोक कठाणे, गौरी टिबडीवाल, श्रेया देशमुख, निलेश किटे, वंदना भुते, जयंत सालोडकर उपस्थित होते.