शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तारण योजनेत हिंगणघाट कृषी बाजार समितीला पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 23:36 IST

खुल्या बाजारात शेतकºयांच्या शेतमालाचे भाव कोसळल्यावर त्यांना न्याय व दिलासा देण्याकरिता .....

ठळक मुद्देनागपूर विभागातील एकमेव कृउबास : तारणावर शेतकºयांना दिले २.४१ कोटींचे कर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : खुल्या बाजारात शेतकºयांच्या शेतमालाचे भाव कोसळल्यावर त्यांना न्याय व दिलासा देण्याकरिता राज्य शासनाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांना शेतमाल तारण योजना सुुरू करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने नागपूर विभागातून तारण योजनेच्या माध्यमाने एकमेव हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीने उत्कृष्ट कार्य केले. याबद्दल समितीला गुरुवारी पुणे येथे पुरस्कृत करण्यात आले.पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात पार पडलेल्या सोहळ्यात येथील बाजार समितीद्वारे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, संचालक मधुसूदन हरणे, सचिव टी.सी. चांभारे यांनी पणन व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडून पुरस्कार स्वीकारण्यात आला. कार्यक्रमात कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, पणन संचालक ए.बी. जोगदंड, व्यवस्थापक डी.डी. शिंदे, बाजार समितीचे राज्याध्यक्ष दिलीप मोहिते पाटील, नाबार्डचे प्रतिनिधी तथा पणन मंडळाचे सदस्य उपस्थित होते. शिवाय राज्यात कार्यरत ३०७ बाजार समित्यांचे सभापती, संचालक, सचिव तथा कर्मचारी उपस्थित होते.तारण योजनेचे ३१३ शेतकरी लाभार्थीहरभरा, गहु व अन्य धान्य आणणाºया एकूण ३१३ शेतकºयांचा शेतमाल तारण योजनेत ठेवून सदर शेतकºयांना २ कोटी ४१ लाख ८३ हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. एकूण १२ हजार ३३८ क्विंटल शेतमाल २६ आॅक्टोबर २०१६ ते १२ सप्टेंबर २०१७ या कालावधीत तारणावर ठेवून हे धनादेश देण्यात आले. या तारणाची आॅनलाईन सविस्तर माहिती पणन संस्थेला दिल्यावर ही निवड झाली आहे. तारण योजनेसाठी लातुर, अकोला, अमरावती, धामनगाव या बाजार समित्यांचीही निवड झाली. नागपूर विभागातून एकमेव हिंगणघाट कृउबासची निवड झाली.