शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्ह्यांसाठी दिंडीतून जागृती

By admin | Updated: January 8, 2017 00:44 IST

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सध्याचे चतुर रसाईत गुन्हेगार नागरिकांना गंडा घातल आहेत.

पोलीस यंत्रणेचा उपक्रम : अधीक्षकांच्या हस्ते जनजागर सुरू वर्धा : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सध्याचे चतुर रसाईत गुन्हेगार नागरिकांना गंडा घातल आहेत. दिवसेंदिवस आॅनलाईन फसवणूक, खोटी बतावणीकरून नागरिकांना ठगले जात असून सायबर गुन्ह्याचा आलेख वाढ होत आहे. सदर बाब गंभीर असल्याने होणारी नागरिकांची फसवणूक रोखण्यासाठी तसेच जनजागृती करण्यासाठी वर्धा पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकत सायबर सुरक्षा दिंढीचे आयोजन केले आहे. या दिंडीला शनिवारी पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी हिरवी झेंडी दाखविली. पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात शनिवारी सायंकाळी ६ वाजता आयोजित विशेष कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक अंकित गोयल, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक पराग पोटे, पोलीस उपनिरीक्षक एस. बी. कडू, पोलीस निरीक्षक अचल मलकापूरे, पोलीस शिपाई कुलदीप टांकसाळे, निलेश कट्टोजवार, दिनेश बोथनकर, अनुप कावळे, अक्षय राऊत आदींची उपस्थिती होती. एम. एच. ३२ जे. १५२ या पोलीसी वाहनावर जनजागृतीपर पोस्टर लावण्यात आले आहे. तसेच या फिरत्या पोलीसी वाहनाच्या माध्यमातून आॅनलाईन होणाऱ्या फसवणुकीपासून जनता स्वत:ला कशी बचावू शकते याची माहिती देणार आहे.(शहर प्रतिनिधी) संगणकीय व तांत्रिक गुन्ह्याबाबत करणार जनजागृतीवाढत्या सायबर क्राईमला आळा घालण्यासाठी पोलिसांच्यावतीने विशेष वॅन तयार करण्यात आली आहे.या वॅनवर विविध प्रकारच्या जनजागृतीपर माहितीचे पोस्टर चिकटविण्यात आले आहे. नागरिकांमध्ये जनजागृती हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या दिंडीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये संगणकीय व तांत्रिक गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. दिंडीला ५० हजाराच्या फसवणुकीची सलामी वर्धा- मी बँकेचा अधिकारी बोलत असून आपले एटीएम ब्लॉक झाले आहे, ते सुरळीत करण्यासाठी एटीएमवरील सोळा अंकी नंबर व पिन कोड सांगा अशी बतावणी करून कवडघाट येथील अश्वजीत नानाजी माने याच्या बँक खात्यातून अज्ञात आरोपीने रोकड काढली. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली असून शनिवारी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्वजीत याला अज्ञात व्यक्तीने फोन करून आपण बँकेचा अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. तुमचे एटीएम ब्लॉक झाल्याने ते सुरू करण्यासाठी एटीएम वरील सोळा अंकी नंबर व पिन कोड सांगण्याचे सांगितले. त्यावर अश्वजीतने विश्वास ठेऊन सदर माहिती दिली असता आरोपीने त्याचा वापर करून अश्वजीत याच्या हिंगणघाट येथील बँकखात्यातून ४९ हजार ९९७ रुपये काढून घेतल्याचे तक्रारीत नमुद असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर घटनेची अश्वजीत माने यांनी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.