शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील व्यावसायिकांची कर भरण्याबाबत टाळाटाळ

By admin | Updated: August 3, 2016 01:02 IST

जिल्ह्यातील बऱ्याच व्यावसायिकांसह सोसायट्यांनी कराचा भरणा केला नसल्याचे समोर आले आहे

शासनाची व्यवसाय कर नावनोंदणी अभय योजना वर्धा : जिल्ह्यातील बऱ्याच व्यावसायिकांसह सोसायट्यांनी कराचा भरणा केला नसल्याचे समोर आले आहे. यामुळे शासनाला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. जिल्ह्यात व्यवसायकरांतर्गत अनेक व्यक्ती असताना जिल्ह्यात कराचा भरणा अत्यल्प झाल्याचे समोर आले आहे. अशा व्यावसायिकांकरिता शासनाने व्यवसायकर नावनोंदणी अभय योजना अंमलात आणली आहे. व्यवसायकर कायद्यान्वये कर भरण्यास पात्र असणाऱ्या ज्या व्यक्तीने नावनोंदणी करून घेतली नाही, किंवा नावनोंदणीसाठी अर्ज केलेला आहे. अशांपैकी काहींचे गत आठ वर्षापर्यंत कराचा भरणा केला नाही अशांना प्रतिदिवस दोन रुपयेप्रमाणे दंड भरावा लागतो. ज्या व्यक्ती नावनोंदणीस पात्र असून नाव नोंदणी धारक नसून व्यवसायकर भरत नाहीत. अशा व्यक्ती व ज्यांनी अजुनपर्यंत नावनोंदणी घेतलेली नाही, अशा व्यक्तीसाठी शासनाने व्यवसायकर नावनोंदणी अभय योजना २०१६ जाहीर केलेली आहे. नावनोंदणी धारकाने प्रमाण वाढविणे व कायद्यानुसार बंधनकारक असणारे व्यवसायकर भरुन घेणे व त्या अनुषंगाने शासनाचा महसूल वाढविणे या हेतुने शासनाने ही योजना आणलेली आहे. या योजनाचा लाभ घेण्याकरिता नावनोंदणी अर्ज १ एप्रिल २०१६ ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीत करणे आवश्यक आहे. तसेच गत तीन वर्षांचा सुरू आर्थिक वर्ष २०१६-१७ या वर्षाचा व्यवसायकर भरणा करणे अनिवार्य आहे. व्यवसायकर नावनोंदणी अभय योजनेखाली नावनोंदणी घेणाऱ्यास १ एप्रिल २०१३ पूर्वीचे व्यवसायकर व व्याज माफ होईल तसेच व्यवसायकर कायदा कलम ५(५) खाली भरावयाचा दंड सुद्धा होईल. नावनोंदणी करण्याकरिता शासनाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.(प्रतिनिधी)