शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श शिक्षकांच्या दोन वेतनवाढी देण्यास शासनाची टाळाटाळ

By admin | Updated: September 10, 2016 00:32 IST

क्रीडा व शिक्षण विभागाकडून शिक्षकांना राज्य व राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात.

न्यायालयाचाही अवमान : परिपत्रकासाठी पुन्हा याचिकेची तयारीकारंजा (घा.) : क्रीडा व शिक्षण विभागाकडून शिक्षकांना राज्य व राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. यात दोन आगाऊ वेतनवाढी देण्याचा निर्णय १९८४ मध्ये घेतला. यामुळे शिक्षक सुखावले; पण सहाव्या वेतन आयोगापसून पूर्वसूचना न देता वेतनवाढी बंद केल्या. याविरूद्ध ३८ शिक्षकांनी याचिका दाखल केली. न्यायालयाने वेतनवाढी देण्याचे आदेश दिले; पण एक वर्ष लोटूनही कार्यवाही झाली नाही. यामुळे शिक्षकांत असंतोष पसरला आहे. १९५८-५९ पासून राष्ट्रीय तर १९६२-६३ पासून राज्य पुरस्कार देण्याचा निर्णय क्रीडा व शिक्षण मंत्रालयाने घेतला. यातील निकषाच्या आधारे प्राथमिक, माध्यमिक, अपंग व आदिवासी भागात कार्यरत व काही महिला शिक्षक अशा १३० शिक्षकांची निवड करून पुरस्कार जाहीर केले जातात. शिक्षक दिनी त्यांचे वितरण होते. १९८४ पासून या आदर्श शिक्षकांना दोन वेतनवाढी दिल्या जात होत्या. ही चांगली परंपरा २००५ पर्यंत कायम होती; पण २००६ मध्ये सहावा वेतन आयोग लागू होताच बंद झाली. वास्तविक, या वेतनवाढी बंद करता येत नाही. शिवाय सहाव्या वेतन आयोगाच्या मार्गदर्शक नियमावलीत तसा उल्लेख नाही. उलट निवडपत्रात दोन वेतनवाढी निरंतर देण्यात येईल, असा स्पष्ट उल्लेख आहे. दरवर्षी १३० प्रमाणे २००६ ते २०१३ पर्यंत १०४० शिक्षकांना न्याय व हक्काच्या आर्थिक सवलतीपासून शासनाने वंचित ठेवले आहे. २०१३ नंतरच्या शिक्षकांना एक लाख रुपयांचा विशेष निधी देण्यात येत असल्याने दोन वेतनवाढी बंद करायला हव्या होत्या. तसे न करता सरसकट निर्णय घेण्यात आला. या अन्यायाविरूद्ध ३८ आदर्श शिक्षकांनी २०१४ मध्ये उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली. यावर १६ डिसेंबर २०१४ रोजी निर्णय झाला. सहा महिन्यांच्या आत राज्य शासनाने सर्व थकबाकीसह दोन वेतनवाढी द्याव्या, असे नमूद केले; पण वर्ष लोटूनही त्या देण्यात आल्या नाही. यामुळे आदर्श शिक्षकांनी महाराष्ट्र शासनाविरूद्ध अवमान याचिका दाखल केली. यानंतर दोन वेतनवाढी देण्याचे मान्य केले; पण हिशेबासाठी वेळ मागितला. ३१ आॅगस्ट २०१६ ही शेवटची संधी न्यायालयाने शासनाला दिली. यातही शासनाने २८ एप्रिल २०१६ रोजी परिपत्रक काढून सहाव्या नव्हे तर पाचव्या वेतन आयोगानुसार काल्पनिक वाढ लक्षात घेत दोन वेतनवाढी देण्यात येतील. या वेतनवाढी केवळ मार्च २०१५ पर्यंत दिल्या जातील, पूढे नाही, असे नमूद केले. यानुसार आदर्श शिक्षकांना कमी रक्कम मिळणार आहे. शासनाच्या या दुराग्रही भूमिकेमुळे सर्व आदर्श शिक्षकांना पुन्हा न्यायालयात जावे लागणार, असे दिसते.(तालुका प्रतिनिधी)