शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयीन खटला जिंकूनही कामावर रूजू करण्यास टाळाटाळ

By admin | Updated: February 7, 2017 01:10 IST

कामावर रूजू करून घेण्याबाबत न्यायालयातील खटला जिंकूनही बोरगाव (मेघे) येथील रहिवासी असलेल्या विनायक थूल यांना कामावर रूजू करून घेण्यात आले नाही.

अडीच दशकांपासून तगमग : भारतीय खाद्य निगमच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्षवर्धा : कामावर रूजू करून घेण्याबाबत न्यायालयातील खटला जिंकूनही बोरगाव (मेघे) येथील रहिवासी असलेल्या विनायक थूल यांना कामावर रूजू करून घेण्यात आले नाही. यातून स्थानिक भारतीय खाद्य निगमच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाचा अवमानच केला आहे. शिवाय रूजू करून न घेतल्याने थूल कुटुंबियांची उपासमार होत आहे. गत २६ वर्षांपासून रूजू करून घेण्यासाठी त्यांचा लढा सुरू असून संघटनाही समस्या समजून घेण्यास तयार नसल्याने ते त्रस्त आहेत.बोरगाव (मेघे) येथील विनायक थूल हे वर्कर्स युनियनच्या माध्यमातून भारतीय खाद्य निगमच्या सेवेत १९८७ ते १९९० या कालावधीत कार्यरत होते. १९९० मध्ये माथाडी युनियन व वर्कर्स युनियनने संप केला होता. हा संप सुमारे तीन महिने सुरू होता. संपाच्या काळात माथाडी कामगाराचा मृत्यू झाल्याने काही कामगारांना तुरूंगात डांबण्यात आले होते. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. तीन वर्षानंतर माथाडी कामगार तसेच युनियनच्यावतीने कामगार न्यायालयात कामगारांना कामावर घेण्याकरिता खटला दाखल केला होता. कामगार न्यायालयात युनियनच्या बाजूने निकाल लागला. दरम्यान, संघटनेच्या तत्कालीन अध्यक्षांनी जवळच्या कामगारांना कामावर रूजू करून घेतले. मला रूजू करून घेण्यात आले नाही, असा आरोप थूल यांनी केला आहे. कामावर पूर्ववत रूजू करून घेण्याकरिता वारंवार कार्यालयाच्या चकरा मारल्या; पण कुणीही लक्ष देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सध्या हाताला काम नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. थूल कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट आले आहे. वरिष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी या समस्येची दखल घेत त्यांना कामावर रूजू करून घ्यावे, अशी मागणी विनायक थूल व त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)