शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे दोन दिवस पेरणी टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 23:04 IST

जून महिन्यात तब्बल २८ दिवस बेपत्ता राहिलेला वरूणराजा सदर महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसात बऱ्यापैकी वर्धा जिल्ह्यात बरसल्याने शेतजमीनही ओली झाली आहे. सध्यास्थितीत जमिनीत असलेला ओलावा पेरणीसाठी योग्य असला तरी हवामानखात्याकडून उद्या मंगळवार आणि बुधवार ३ जुलैला वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आल्याने या दोन दिवशी शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे टाळावे, असे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देकृषीतज्ज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जून महिन्यात तब्बल २८ दिवस बेपत्ता राहिलेला वरूणराजा सदर महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसात बऱ्यापैकी वर्धा जिल्ह्यात बरसल्याने शेतजमीनही ओली झाली आहे. सध्यास्थितीत जमिनीत असलेला ओलावा पेरणीसाठी योग्य असला तरी हवामानखात्याकडून उद्या मंगळवार आणि बुधवार ३ जुलैला वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आल्याने या दोन दिवशी शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे टाळावे, असे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.मंगळवार २ आणि बुधवार ३ जुलैला वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकरी पुढेही दमदार पाऊस येईल, अशी अपेक्षा बाळगुण पेरणीच्या कामाला गती देत आहेत. यंदाच्या वर्षी १ जुलै सकाळपर्यंत वर्धा तालुक्यात ७१.०३ मिमी, सेलू १५८.४२ मिमी, देवळी ९५.६८ मिमी, हिंगणघाट १०७.१२, समुद्रपूर ११६.७१ मिमी, आर्वी ८७.५४, आष्टी ९६.०४ व कारंजा तालुक्यात ११८.१७ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यात संपूर्ण जून महिन्यात सरासरी ३२१.६३ पाऊस पडतो. मात्र, आतापर्यंत केवळ सरासरी १०६.३४ पाऊस पडला आहे. असे असले तरी झालेल्या अल्प पावसामुळे संध्या शेतजमिनीत ओलावा असल्याने पेरणीची कामे शेतकरी करू शकतो; पण जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यास शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकºयांनीही या दोन दिवसांमध्ये पेरणी करण्याचे टाळावे, असे सांगण्यात येते.४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर होणार विविध पिकांची लागवडयंदाच्या खरीब हंगामात एकूण ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. खरीप ज्वारी १ हजार १०० हेक्टर, ६५ हजार हेक्टरवर तूर, ४०० हेक्टरवर मुंग, ७०० हेक्टरवर उडीद, ६७५ हेक्टरवर खरीप भुईमुंग, १ लाख २५ हजार ९२५ हेक्टरवर सोयाबीन तर २ लाख ३५ हजार ५०० हेक्टरवर कापूस पिकाची लागवड होणार असल्याचाही अंदाज कृषी विभागाला आहे.आतापर्यंत झालेल्या पावसामुळे जमिनीत बºयापैकी ओलावा आहे. शिवाय पेरणी करण्यासाठी जमिनीतील हा ओलावा फायदेदायक ठरणारा आहे. परंतु, हवामानखात्याने मंगळवार व बुधवारी वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन शेतकºयांनीही सदर दोन दिवस पेरणी करण्याचे टाळले पाहिजे.- डॉ. विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.