शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीची माहिती ग्रामपंचायतला देण्यास टाळाटाळ

By admin | Updated: June 24, 2014 00:00 IST

ग्रामपंचायत आनंदवाडी येथील पोटनिवडणुकी संदर्भात तलाठ्याने कुठलीच माहिती दिली नाही. त्यामुळे गावाकऱ्यांना निवडणुकीपासून वंचित राहण्याची वेळ आली होती. या प्रकरणी गावकऱ्यांनी

आष्टी(शहीद) : ग्रामपंचायत आनंदवाडी येथील पोटनिवडणुकी संदर्भात तलाठ्याने कुठलीच माहिती दिली नाही. त्यामुळे गावाकऱ्यांना निवडणुकीपासून वंचित राहण्याची वेळ आली होती. या प्रकरणी गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून दोषींवर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.तालुक्यात विविध ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणूक पार पडली. त्यानंतर पोटनिवडणुका संदर्भात कार्यक्रम जाहीर झाला. यात ग्रामपंचायत आनंदवाडीचा समावेश होता. निवडणुकीची माहिती दहा दिवसांच्यापूर्वी ग्रामपंचायतीला तहसील कार्यालयाकडून मिळणे अपेक्षित आहे. त्यासासाठी संबंधीत गावाच्या तलाठ्याकडे काम सोपविण्यात आले होते; मात्र येथील तलाठी रजेवर गेले. ते रजेवर असल्याने त्यांचा प्रभार असलेल्या तलाठ्याने ती माहिती गावाकऱ्यांना देणे आवश्यक होते. वास्तविकतेत मात्र तहसीलदारांनी येथील प्रभार कोणत्याही तलाठ्याला दिला नसल्याचे समोर असले. शासनाच्या या दप्तरदिरंगाईचा फटका आनंदवाडी येथील गावकऱ्यांना बसल्याचा आरोप होत आहे.या प्रकरणी सुनील भार्गव, अनंत खोरगडे, ज्ञानेश्वर वानखडे यांच्यासह गावकऱ्यांनी या प्रकरणाला तलाठीच जबाबदार असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे. निवडणुकीसारख्या संवेदनशील विषायात तलाठ्याकडून ढवळाढवळ केल्या जात असल्याने ग्रामपंचायत सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. येथील तलाठी रजेवर असल्याचा अर्ज प्रभारी तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्याकडे दिला होता. चव्हाण यांनी येथील तात्पुरता कार्यभार दुसऱ्या तलाठ्याकडे द्यावा असे सांगितले; मात्र त्याची आॅर्डर निघाली नाही. त्यामुळे या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आनंदवाडी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)